जुन्नर तालुका खरेदी विक्री संघामध्ये खते मुबलक प्रमाणात उपलब्ध 

दत्ता म्हसकर
बुधवार, 11 जुलै 2018

जुन्नर- शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खरेदी-विक्री संघात वाजवी दरात विविध खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती अध्यक्ष बाळकृष्ण वर्पे व व्यवस्थापक बाबाजी शिरसाठ यांनी दिली. 

तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन,भुईमूग, तूर, मूग,उडीद,वटाणा यांसह आदिवासी भागात भाताचे उत्पादन घेतले जाते. जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने दरवर्षी या पिकांची दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. 

या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये संघाच्या वतीने महाबीज कंपनीचे इंद्रायणी भात 545 क्विंटल‎, CO 51 भात 80 क्विंटल, फुले समृद्धी भात 100 क्विंटल, सह्याद्री भात  100 क्विंटल, सोयाबीन 1900 क्विंटल, तूर 2 क्विंटल, मूग 2 क्विंटल, उडीद 2 क्विंटल आदी बियान्याची विक्री करण्यात आले. या पिकांसाठी आवश्यक असलेली 10:26:26, युरिया, 12:32:16, 24:24:08, 18:18:10, सुपर फॉस्फेट दाणेदार, 14:35:14, पोटॅश इत्यादी खते व ठिबकची सर्व प्रकारची नामांकित कंपन्यांची खते तसेच टोमॅटो व मिरची सारख्या मुख्य नगदी पिकांसाठी कोरोमंडल कंपनीचे अल्ट्रासोल नावाचे उपयुक्त खत देखील उपलब्ध असल्याचे व्यवस्थापक बाबाजी शिरसाठ यांनी सांगितले. 

संस्थेचे मार्गदर्शक व जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाचा कारभार पारदर्शकपणे केला जात असून गतवर्षी संघाला वार्षिक 19 लाख रुपये इतका नफा झाला असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.

Web Title: In the Junnar taluka Purchase Team, there is abundant availability of fertilizers