जुन्नर - बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकिवरील मुलगा व आई जखमी 

पराग जगताप
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

ओतूर (जुन्नर) - डिंगोरे येथे दुचाकीवर हल्ला करुन बिबट्याने दुचाकिस्वार मुलाला व त्याच्या आईला जखमी केले आहे. तर हल्ला केल्या नंतर ही बिबट्याने त्यांच्या दुचाकिचा दोनशे मिटर पर्यंत पाटलाग केला. 

हा बिबट्याचा हल्ला डिंगोरे गावाच्या हद्दीत आमलेशिवारात कालव्या जवळ तांबे वस्ती जवळ झाला. यात दुचाकीवरिल मंगल विठ्ठल कुमकर वय.50 व त्यांचा मुलगा दिनेश विठ्ठल कुमकर वय.31 रा.कोळवाडी ता.जुन्नर हे जखमी झाले आहेत.

कुमकर हे डिंगोरे परिसरातील आमले शिवारातील तांबे मळ्यात नातेवाईका कडे भेटण्यासाठी आले होते. परत कोळवाडीला जाता असताना माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे यांच्या घराच्या पुढे कालव्या जवळ बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात दुचाकिवर मागे बसलेल्या मंगल कुमकर यांना बिबट्याचे पायाला तीन ठिकाणी दात व नखे लागल्या तर दिनेश यास ही बिबट्याची नखी लागल्याने जखम झाले. मात्र दिनेश यांनी प्रसंगावधान राखत गाडी न थांबवता तशीच पुढे जोरात नेली, चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकिचा दोनशे मिटर पर्यंत पाठलाग केला. रात्र असल्याने दिनेश याने कुठेच मधी न थांबता दोघे ही जखमी असुन, ही कोळवाडीला घरी पोहचले. त्यानंतर फोन करुन नातेवाईकास सदर घटनेची माहिती दिली. बिबट्याचा हल्ला झालेला समजताच डिंगोरे येथून समिर शेरकर, संदिप नेहेरकर, सुमित लोहोटे हे कोळवाडीला पोहचले. तो पर्यंत 108 नंबर वर संपर्क साधुन शासकिय रुग्णवाहीका बोलावण्यात आली होती. त्यानंतर सर्वानी जखमीना तातडीने ओतूर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आनण्यात आले. सदर बिबट हल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनरक्षक विशाल अडगळे यांना देण्यात आली होती. त्यामुळे ते आधीच ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते. जखमीवर येथे प्रथोमोउपचार करुन त्याना बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी पिंपरी चिंचवड येथिल शासकिय दवाखान्यात पाठवण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य अंकश आमले व माजी. जि.प.सदस्य बबन तांबे यानी वनविभागाच्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त करत ओतूर वनविभागा कडुन मानवा वर होणारे बिबट्याचे हल्ले गांभिर्याने घेतले जात नसुन हल्ला झाल्यावर फक्त तातपुर्ती ततपर्ता दाखवली जाते. मात्र बिबट प्रवण गावामध्ये वनविभागाने बिबट मानव संघर्ष टाळण्यासाठी नियमीत व ठोस उपायोजना करणे नियमीत रात्री गस्त घालणे गरजेचे आहे. तसेच या परिसरात पहाणी करुन पिंजरा लावणे गरजेचे आहे. तरी वनविभागाने बिबट व मानव संघर्ष टाळण्यासाठी योग्य उपाय योजना कराव्यात.

Web Title: Junnar - Two-wheeler and mother injured due to leopard attack