junnar
junnar

जुन्नरची बहुचर्चित पाणी योजना अखेर संपुष्टात

जुन्नर - जुन्नर नगर पालिकेच्या 12 कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने तसेच मुदतीनंतर सात वर्षात ठेकेदारास 12 वेळा मुदतवाढ देऊनही त्याने काम पूर्ण न केल्याने ही योजना रद्द करण्याचा निर्णय विशेष सभेत घेण्यात आला. 

नगराध्यक्ष शाम पांडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर, गटनेते दिपेश परदेशी, दिनेश दुबे, जमीर कागदी व नगरसेवक तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते. पांडे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या (UIDSSMT) योजनेतंर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पुणे येथील स्कायलार्क इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ३० जुलै २००९ रोजी देण्यात आले होते. सुमारे १२ कोटी रुपये खर्चाच्या योजनेची मुदत ३० जानेवारी २०१२ पर्यत होती. सदर योजना अद्यापही अपुर्ण अवस्थेत आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून केंद्र सुरु नाही. 

ठेकेदाराने मुदत संपल्यानंतर नोव्हेंबर १६ पर्यत सुमारे १२ वेळा मुदातवाढ देउनही काम पुर्ण केले नाही. या कामकाजाची देखरेख करण्यासाठी नाशिकच्या निसर्ग कन्सलटसीची नियुक्ती केली होती परंतु त्यांनीही योग्य कामकाज केले नाही म्हणून त्यांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. 

ठेकेदारची विश्वसनियता संपुष्टात आली आहे. ही योजना पूर्ण करून शहरास स्वच्छ पाणी पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी योजना बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ठेकदाराचे नगर परिषदेकडे जमा असलेले ६० लाख रुपये नगर परीषद फंडात जमा करून घेऊन ठेकेदारास काळया यादीत टाकण्याचे आदेश नगराध्यक्ष पांडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

जुन्नर शहरासाठी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात येईल. सदर योजना सुरु झाल्यापसून आजपर्यत ज्या लोकप्रतिनिधी व नागरीयांनी त्यांच्या जबाबदारीचे पालन योग्य रीतीने केले नसेल अशा सर्वांवरती कडक करवाई करून गुन्हे दाखल कण्याची मागणी नगरसेवक समीर भगत, दिपेश परदेशी यांनी यावेळी केली. सर्वपक्षीय नगरसेवकाच्या सहकार्याने हा निर्णय झाला असल्यामुळे सर्वांनी या निर्णयांचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com