Junner News : विसर्जन मार्गावर असणार चोख बंदोबस्त; पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारींकडून पाहणी

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शहरातून गणपती विसर्जन मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.
junner
junner sakal

जुन्नर - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गणेशोत्सव निमित्ताने जुन्नर पोलीस ठाण्यास (शनिवार ता.२३ रोजी) भेट दिली.

यावेळी फुलारी यांनी जुन्नर शहरातील गणपती विसर्जन मार्गाची पाहणी केली. वनविभागाच्या शिवराई विश्रामगृहात दुपारी जुन्नर उपविभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. गणेशोत्सव व अन्य कामकाजाचा आढावा देखील घेतला.

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शहरातून गणपती विसर्जन मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय औदयोगिक सुरक्षा बल पथकाचे ६०,राज्य राखीव पोलीस बल गटाचे ३० , दंगा काबू पथकाचे १५ जवान तसेच २० स्थानिक पोलीस अंमलदार व १० गृहरक्षक दलाचे जवान संचलनात सहभागी झाले होते.

junner
Pune Ganeshotsav : तंदुरुस्त बंदोबस्तासाठी पोलिसांना चिक्की वाटप

गणेशोत्सव काळात जुन्नर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या २१२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून यात गणेशोत्सव काळात २० जणांना तडीपार तर १२५ जणांना १४९ ची नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com