जेजुरीहून बारामती अवघ्या ३० मिनिटांत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

जेजुरी ते बारामती हा ५० किलोमीटरचा टप्पा अवघ्या तीस मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. राज्य सरकारच्या हायब्रीड ॲन्युइटी प्रकल्पांतर्गत जेजुरी ते नीरा नरसिंहपूर या टप्प्यातील मोरगाव ते बारामती या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्‍चित केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई व उपअभियंता सत्यशील नगरारे यांनी दिली.

रस्ता मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; मोरगाव ते बारामती काम वेगाने सुरू
बारामती - जेजुरी ते बारामती हा ५० किलोमीटरचा टप्पा अवघ्या तीस मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. राज्य सरकारच्या हायब्रीड ॲन्युइटी प्रकल्पांतर्गत जेजुरी ते नीरा नरसिंहपूर या टप्प्यातील मोरगाव ते बारामती या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्‍चित केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई व उपअभियंता सत्यशील नगरारे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जेजुरी-मोरगाव-बारामती-कळंब-बावडा- नीरा नरसिंगपूर असा ८६ किलोमीटर लांबीचा रस्ता नव्याने करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत २०४ कोटी ७७ लाख रुपये इतकी असून या प्रकल्पातील जेजुरी ते मोरगाव हा टप्पा पूर्ण झाला असून आता मोरगाव ते बारामती रस्त्याचे काम सुरू आहे. जेजुरी ते बारामती हा रस्ता दहा मीटर रुंदीचा म्हणजेच तीन पदरी असेल. यामध्ये काम झालेल्या रस्त्यांवर थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे मारण्याचे कामही करण्यात आले आहे. सध्या मोरगाव ते बारामती या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. साइडपट्ट्या खोदून तेथे मुरूम भरून नंतर खडीकरण करून नंतर पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. तीन पदरी रस्ता झाल्यानंतर वाहतूक अधिक वेगाने होईल व ओव्हरटेक करताना सोपे जाईल.

हडपसर उड्डाणपुलाखालून १ वर्षाच्या बाळाचे अपहरण; आठवड्यातील दुसरी घटना

बारामती मोरगाव रस्त्यावरील मोठ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून मेडद ते बारामती टोलनाक्‍यापर्यंतच्या रस्त्याचे चार पदरीकरण करण्याचेही काम सुरू झाले आहे. सोळसकर वस्तीनजीक असलेला जुना पूल पाडून तेथेही तीन कोटी रुपये खर्चून नवा पूल उभारला जाणार आहे. 

कऱ्हावागजनजीक असलेले अवघड वळणही काढले जाणार असून यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली गेली. हे वळण धोकादायक असून येथे अनेक अपघातही झालेले आहेत. १ जानेवारी २०२० रोजी हे काम सुरू झालेले असून दोन वर्षे कामाची मुदत आहे. 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयात बसविणार ऑक्सिजन टँक

पुणे बारामतीच्या जवळ येणार
बारामती ते जेजुरी हे अंतर जर तीस मिनिटांत पूर्ण झाले तर बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. अवघ्या एका तासात बारामतीकर दिवेघाट गाठू शकतील, असा अंदाज आहे. रस्ता चांगला झाल्यास इंधन, वेळ यांची बचत होऊन वाहनांचे आयुर्मानही वाढेल. 

ही कामे होणार

  • दोन्ही बाजूंना व मध्ये थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे मारले जाणार
  • रात्रीच्या वेळेस अंदाज येण्यासाठी रेडियमचे कॅट आईज लावणार
  • सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावले जाणार
  • अवघड वळणे काढली जाणार
  • वाहनचालकांच्या माहितीसाठी जागोजागी फलक उभारणी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Just 30 minutes from Jejuri to Baramati