फोटो पाहून तुम्हीच सांगा, कोरोना का नाही मुक्काम वाढवणार? 

NARAYNGOAN
NARAYNGOAN
Updated on

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील नारायाणगाव येथील बाजारपेठेत लॉकडाउन शिथिल केल्यानंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. नागरिक व व्यापारी यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.

नारायाणगाव येथील पुणे- नाशिक महामार्गावर बसस्थानक चौकात मागील दिड महिन्यात आज प्रथमच वाहतुकीची कोंडी झाली होती. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र आज येथील बाजारपेठेतून दिसत होते. कोरोनाचे भय संपले अशा अविर्भावात नागरिक वागत असल्याचे दिसून येत आहे. 

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, वारूळवाडी ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन, व्यापारी यांची संयुक्त बैठक घेऊन सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. यामधून हॉटेल, पानटपरी, सलून, ब्युटी पार्लर, मिठाई दुकाने, बार व परमिट रूम वगळण्यात आले. ग्राहक व व्यापारी यांनी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. दुचाकीवर एकाच व्यक्तीने प्रवास करावा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, आदी सूचना सरपंच योगेश पाटे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी केल्या होत्या. मात्र, या कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

दुचाकीवरून दोन ते तीन व्यक्ती प्रवास करत होत्या. येथील बसस्थानक चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, पोलिस दुर्लक्ष करत असल्याने दुचाकीस्वार सैराट झाले होते. एकूणच सद्य स्थिती पाहता नारायणगाव, वारूळवाडी ग्रामपंचायत व पोलिस स्टेशन यांच्या वतीने मागील दीड महिना घेतलेली मेहनत वाया जाते की काय, अशी शंका ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. 

फेरविचार करणार 
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील म्हणाले की, नागरिक व व्यापारी यांनी घालून दिलेल्या अटीचे पालन न केल्यास लॉकडाउनचा फेरविचार केला जाईल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिक दुकाने पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com