काजोलने साधला दिलखुलास संवाद 

काजोलने साधला दिलखुलास संवाद 

पुणे -महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचा ज्वलंत प्रश्‍न असो वा मुलांचे पालकत्व....चित्रपट क्षेत्रातील बदलते प्रवाह असो वा महिलांवरील वाढते अत्याचार...अशा विविध विषयांवर अभिनेत्री काजोल देवगण बुधवारी बोलकी झाली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या काजोलने आपल्या दिलखुलास संवादातून विविधांगी विषय उलगडले. पण, स्तनाच्या कर्करोगाशी लढताना आत्मविश्‍वास बाळगणाऱ्या महिलांचे कौतुक करायलाही ती विसरली नाही. आपल्या अभिनयातून रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या काजोलने आपल्या गप्पांमधूनही उपस्थितांची मने जिंकली.

"प्रशांती कॅन्सर केअर मिशन'तर्फे लालेह बुशेरी यांनी स्तनाच्या कर्करोगाशी लढणाऱ्या 23 महिलांवर लिहिलेल्या "ट्रायम्फ ओव्हर ब्रेस्ट कॅन्सर ः ओडीसीस्‌ ऑफ फिनोमिनल वुमेन' या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिने पत्रकारांशी संवाद साधला. अभिनेत्री तनुजा, डॉ. आनंद कोपीकर, देवल पटेल या वेळी उपस्थित होते. 

काजोल म्हणाली, ""महिलांनी स्वतःची काळजी घ्यायला शिकायला हवे. स्वतःबद्दल बोलायला शिका. लोक आपल्याला सल्ले देतील. पण, त्यापेक्षा आपणच आपल्यासाठी उभे राहायला शिका. बोललो नाहीतर आपला आवाज पोचणार नाही. महिलांनी बोलायला शिकावे.'' 

आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यस्त असलेल्या काजोलची खूप दिवसांनंतर अनपेक्षित भेट आई तनुजा यांच्याशी झाली. आईला भेटताच काजोलने तनुजा यांची गळाभेट घेतली. त्यानंतर दोघी गप्पांमध्ये रंगल्या. आई शोभना समर्थ यांच्याविषयी आठवणी असो वा नातवंडांशी असलेले दिलखुलास नात्याविषयीचे गुपित तनुजा यांनी गप्पांमधून उलगडले. काजोल हिने हसत-खेळत तनुजा यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये सहभाग घेतला. 

""स्तनाच्या कर्करोगाचा सामना आज अनेक जणी करीत आहेत. कर्करोगाला सामोरे जाण्यासाठी आत्मिक शक्ती आणि धैर्याची गरज असते. लोक काय बोलतात, याचा विचार करण्यापलीकडे आपण कर्करोगाशी सामना केला पाहिजे. आपण अशा ताकदीने सामोरे जायला हवे. लालेह बुशेरी यांनी आपल्या पुस्तकात कर्करोगाशी सामना करणाऱ्या 23 जणींचा अनुभव मांडला असून, त्या सर्व जणींना हसत-खेळत व स्वच्छंदी जगताना आनंद वाटतो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. 
- काजोल देवगण, अभिनेत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com