मानलं पठ्ठ्याला; आर्थिक अडचणीतही पैलवानांच्या मदतीला आला धावून!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

वडगावशेरी येथे राहणारे काकासाहेब गलांडे यांनी आंबेगाव येथील काकासाहेब पवार क्रीडासंकुलच्या तीन पैलवानांच्या मदतीला देवासारखे धावून आले आहेत.

रामवाडी (पुणे) : महाराष्ट्राच्या मातीत रंगणारा खेळ म्हणजे कुस्ती. कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. अशा या कुस्तीला राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय प्राप्त करून दिला. अनेक पैलवानांनी तांबड्या मातीपासून ते मॅटपर्यत आणि गावापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कुस्तीचा खेळ रंगवून नाव कमावलं ते बलाढ्य शरीरयष्टीच्या जोरावर आणि अंगमेहनतीवर!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, सध्या कोरोनाच्या काळात सर्वांचीच आर्थिक चक्रे फिरली आहेत. काहींचा व्यवसाय ठप्प झाला, नोकरी गेली, तर काहीजण निम्म्या पगारावर काम करतात. अशा परिस्थितीत एखाद्याच्या मदतीला धावून जाणे कठीण झाले असताना वडगावशेरी येथे राहणारे काकासाहेब गलांडे यांनी आंबेगाव येथील काकासाहेब पवार क्रीडासंकुलच्या तीन पैलवानांच्या मदतीला देवासारखे धावून आले आहेत. या पैलवानांना शरीरयष्टी बनवण्यासाठी लागणारा खुराक म्हणजे दूधाची व्यवस्था गलांडे पाहणार आहेत. पैलवानांना दररोज पिण्यासाठी लागणाऱ्या दुधाचा वर्षभराचा खर्च गलांडे यांनी उचलला आहे. 

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

पैलवानांची नावे पुढीलप्रमाणे :-  
पै. अक्षय हिरवडे, (महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेता, 65 किलो, कोल्हापूर), पै. ज्योतिबा अटकळे (आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेता, 57 किलो, पंढरपूर), पै. पंकज पाटील (राष्ट्रीय पदक विजेता स्कूल गेम, 45 किलो, सांगली)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kakasaheb Galande has borne the cost of milk of three wrestlers for one year