
पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात चौफुला इथं कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली होती. न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब मांडेकर यांचाही समावेश आहेत. बाळासाहेब हे भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकरांचे भाऊ आहेत. बाळासाहेब मांडेकरसह दोघांना पहाटे पाच वाजता अटक केली. पण अद्याप त्यांची ओळख परेड झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय.