काळेवाडी सीसीटीव्हीचे वीजमीटरच काढून नेले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे पोलिसांच्या साहाय्याने गुन्हेगार, बेशिस्त चालक, सोनसाखळीचोर व वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील संवेदनशील भागात सीसीटाव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, वीजपुरवठ्याचे महापालिकेने बिल थकविल्याने महावितरणने काळेवाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वीजमीटर काढून नेल्याने ते महिन्यापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

काळेवाडी परिसरात बाजीप्रभू चौक, सुभाषचंद्र बोस चौक, महापालिका शाळा या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी बसविलेल्या सीसीटीव्हीचे उद्‌घाटन शकुंतला धराडे यांच्या हस्ते झाले होते. त्याचे प्रक्षेपण काळेवाडी पोलिस चौकीत ठेवले आहे. या कॅमेऱ्यांना महावितरणने वीजपुरवठा केला असून, प्रत्येक कॅमेऱ्याला वेगवेगळा वीजमीटर बसविला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने बिल थकविल्याने महावितरणने कारवाई करत तीन वीजमीटर काढून नेले व वीजपुरवठा बंद केला. 

महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वीजमीटरचे बिल थकविल्याने ही कारवाई केली असून, शहरातील काही मीटरचे बिल महापालिकेने भरल्याने सीसीटीव्ही सुरू आहेत. 
शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, महावितरण. 

हे नवीन वीजमीटर असून, त्याचे बिल महावितरणने आमच्याकडे न पाठवता परस्पर वीजमीटर काढून नेले. आम्हाला ही बाब पोलिसांकडून समजल्यानंतर बिल भरण्यात आले असून, लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येणार आहेत. 
- संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, महापालिका. 

Web Title: Kalewadi CCTV taken power meter