

Kalewadi BRT Accident
Sakal
काळेवाडी : पीएमपी बसमधून उतरताना दरवाजा बंद झाला. यामुळे बस आणि बीआरटी मार्गात तरुणी अडकली. सहप्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तिला ओढले. त्यामुळे ती बचावली. बसचालकाच्या निष्काळजीपणाने ही घटना घडल्याचा आरोप या तरुणी आणि तिच्या आईने केला आहे. ही घटना साठे बिस्कीट चौकात गुरुवारी (ता.२७) सायंकाळी घडली.