
कळमोडी धरण शंभर टक्के भरले, सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात
चास : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदिवर असणारे कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदिपात्रात होत असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी धरण 12 ऑगष्ट रोजी शंभर टक्के भरले होते मात्र चालु वर्षी धरण एक महिना आधीच म्हणजे ११ जुलै रोजीच भरले आहे.
चास कमान धरणाच्या पाण्यापासून वंच्छित राहिलेल्या खेड तालुक्यातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगांव पठार भागास वरदान ठरणारे हे धरण सोमवार ता.11 रोजी पुर्ण क्षमतेने भरताच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. या धरणात 2010 पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली असून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नसून धरण भरताच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सूरूवात होते. कळमोडी धरण परिसरात पावसाचा जोर गेली आठ दिवसांपासून वाढला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाव व परिसरात पावसाचा जोर चांगल.
राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होवून धरण शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडव्यावरून 501 कयुसेक्स वेगाने पाणी आरळा नदिपात्रात विसर्ग होत असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वेगाने होणार असल्याने नदिकाठच्या गावांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. धरण पातळीवर कर्मचारी रोहिदास नाईकडे, संभाजी बोंबले चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.
धरणात 42.87 द.ल.घ.मी. म्हणजेच 1.51 टीएमसी पाणीसाठा झाला आहे, मागील वर्षी धरण भरण्यासाठी १२ ऑगष्ट हा दिवस उजाडला होता चालू वर्षी 11 जुलै हा दिवस उजाडला म्हणजे तब्बल एक महिना आधीच कळमोडी धरण भरले आहे. धरण परिसरात एक जुनपासून 552 मीमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात येत असल्याने चास कमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.
Web Title: Kalmodi Dam Hundred Percent Water Began Drains
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..