कल्याणी देशपांडेच्या मालमत्तेचा तपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झालेल्या जयश्री ऊर्फ कल्याणी उमेश देशपांडे हिने अनैतिक मार्गाने मिळविलेल्या मालमत्तेचा तपास पोलिस करीत आहेत. आरोपीकडून काही घरांची विजेची बिले, सोपान पिराजी पाडळे यांच्याशी केलेला विकसनशील करारनामा, खरेदीखत, गोविंद चंदवाणी यांच्याशी केलेला सदनिका हस्तांतरण करारनामा, कल्याणी हिचे नातेवाइकांच्या नावाने झालेले काही करारनाम्याची प्रत मिळाल्याचा तपशील पोलिसांनी न्यायालयास सांगितला. 

कल्याणी आणि तिचे दोन साथीदार रवी ऊर्फ प्रदीप रामहरी गवळी (वय 27, रा. कंदलगाव, सोलापूर) आणि रवी ऊर्फ रत्नदीप शिवाजी तपासे (28, रा. शिवनगर, कोथरूड) यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. तपासे हा जामिनावर मुक्त असून, कल्याणी आणि गवळी यांना अटक झाली आहे. या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांच्या पोलिस कोठडीत 9 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. 

कल्याणी आणि तिच्या साथीदारांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा आदी कलमांनुसार गेल्या दहा वर्षांत पंधराहून अधिक गुन्हे नोंदविले गेले आहे. कल्याणी हिने संघटित टोळी तयार करून राज्य आणि परराज्यांतील मुली मिळवून त्यांच्याकडून वेश्‍या व्यवसाय करवून घेतला. मिळालेल्या पैशातून मोठ्या प्रमाणावर बंगला, सदनिका खरेदी केल्या. अधिक तपासाकरिता तिच्या आणि गवळी याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयाकडे केली होती. 

Web Title: Kalyani Deshpande Property inquiry