पहिल्याच फटक्‍यात फुलराणी' टॉपर; पुण्याच्या कल्याणी पुंडलीकचे सीएसमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

"सीएस' परीक्षेत फक्त पास व्हायचे म्हणून अभ्यास सुरू केला, पण बॅडमिंटन पट्टू असलेल्या पुण्यातील कल्याणी पुंडलिक हीने पहिल्याच फटक्‍यात एक्‍झिक्‍युटिव्ह परीक्षेत देशात टॉप करून, पहिला सेट अलगद जिंकला आहे. "फुलराणी'च्या या अनपेक्षीत यशामुळे आनंदाने कुटूंबीयांच्या आनंदालाही पारावर उरला नाही.

पुणे : "सीएस' परीक्षेत फक्त पास व्हायचे म्हणून अभ्यास सुरू केला, पण बॅडमिंटन पट्टू असलेल्या पुण्यातील कल्याणी पुंडलिक हीने पहिल्याच फटक्‍यात एक्‍झिक्‍युटिव्ह परीक्षेत देशात टॉप करून, पहिला सेट अलगद जिंकला आहे. "फुलराणी'च्या या अनपेक्षीत यशामुळे आनंदाने कुटूंबीयांच्या आनंदालाही पारावर उरला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कल्याणी पुंडलिक ही बावधन येथील रहिवासी आहे. आई आर्किटेक्‍ट तर वडील ऑडीटर म्हणून कार्यरत आहेत. कल्याणी "बीएमसीसी'मध्ये (स्वायत्त) बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. बॅडमिंटनच्या रॅकेटवर प्रेम करणारी ती पहिलीत असल्यापासून सेटवर रमली. टायमींग साधून फटकेबाजी करण्यात तरबेज असल्याने कल्याणीने वेल्लूर येथे झालेल्या ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेत महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळवून दिला.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

एप्रिल महिन्यापासून रॅकेटला काहीसे दूर करून तिने "सीएस'च्या अभ्यासावर भर दिला आणि थेट देशात पहिली आली. "सकाळ'शी बोलताना कल्याणी म्हणाली, "लॉ हा माझा आवडता विषय आहे, त्यामुळे "सीएस" करण्याचा निर्णय घेतला. "एक्‍झिक्‍युटिव्ह' कोर्सच्या नवीन अभ्सासक्रमासाठी क्‍लास लावला. एप्रिल महिन्यापासून रोज चुकता ठरलेल्या टाईम टेबलनुसार 10 ते 12 तास अभ्यास सुरू केला. जुन्या प्रश्‍नपत्रीका सोडवून उत्तरे लिहिण्याचा सराव केला, रिवीजनवरीही भर दिला.

दिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...

डिसेंबर महिन्यात परीक्षा दिल्यानंतर प्रश्‍नपत्रीका काहीसी अवघड वाटली, पण दोन्ही ग्रुपमध्ये पास होईन असा विश्‍वास होता. आज निकाल लागल्यानंतर 800 पैकी 584 गुण मिळवत देशात टॉप केल्याचे कळाले. हे यश माझ्यासाठी अनपेक्षीत आहे, असे काही तरी होईल वाटले नव्हते. या निकालामुळे आई, बाब, भाऊ सर्वांनाच खुप आनंद झाला आहे. हा आनंद शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. आता पुढे "सीएस'च्या प्रोफेशनल कोर्समध्येही असेच यश नक्की मिळवेन, असा विश्‍वासही तिने व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyani Pundaliks success in CS exam