अभिमानास्पद ! पुण्याची कल्याणी पुंडलिक "सीएस'मध्ये देशात पहिली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

पुणे : "द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया'तर्फे (आयसीएसआय) डिसेंबर महिन्यात झालेल्या सीएस एक्‍झिक्‍युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये एक्‍झिक्‍युटिव्ह (नवा अभ्यासक्रम) परीक्षेत पुण्याची कल्याणी पुंडलिक देशात प्रथम आली. एक्‍झिक्‍युटिव्ह (जुना अभ्यासक्रम) परीक्षेत चेन्नईच्या प्रिया जी. पहिली आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक्‍झिक्‍युटिव्ह (जुना अभ्यासक्रम) पहिल्या मोड्युलमध्ये 13.54 टक्के, दुसऱ्या मोड्युलमध्ये 16.56 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एक्‍झिक्‍युटिव्ह (नवा अभ्यासक्रम) परीक्षेच्या पहिल्या मोड्युलमध्ये 7.68 टक्के तर दुसऱ्या मोड्युलमध्ये 11.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नव्या अभ्यासक्रमात मुंबईचा अमनदीपसिंग ओबेरॉय द्वितीय, तर भिलवाडा येथील पुलक बन्सल तिसरा आला. जुन्या अभ्यासक्रमात मुंबईचा जोश वझाचिरा द्वितीय, आंध्र प्रदेशचा वेंकटा मुली तृतीय आला.

दिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...

प्रोफेशनल परीक्षेत (जुना अभ्यासक्रम) पहिल्या मोड्युलमध्ये 30.11 टक्के, दुसऱ्या मोड्युलमध्ये 23.74 टक्के, तिसऱ्या मोड्युलमध्ये 34.26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नव्या अभ्यासक्रमानुसारच्या प्रोफेशनलच्या पहिल्या मोड्युलमध्ये 40.08 टक्के, दुसऱ्या मोड्युलमध्ये 28.59 टक्के तर तिसऱ्या मोड्युलमध्ये 31.07 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रोफेशनल जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत इंदूरचा हर्षित जैन प्रथम, मुंबईचा सुशील कुमावत द्वितीय तर मुंबईचाच अब्दुलकादीर जवाडवाला तृतीय आला आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईची श्रुती, गाझियाबादची उर्वशी गुप्ता द्वितीय, तर मुंबईच्या मैत्री मेघानी हिने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyani Pundlik Pune Country topper in CS Exam