esakal | कामशेत : विजेचा धक्का लागून शिरदेतील दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

कामशेत : विजेचा धक्का लागून शिरदेतील दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामशेत : उकसान पठारावरील मेंढीमाळात महावितरणच्या विजेचा शाॅक बसून शिरदे ता.मावळ येथील एका विद्यार्थ्याचा (Students) व एक तरूणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. अविनाश खेमाजी बगाड (वय१६ ) रा.शिरदे व रविंद्र सिताराम बगाड (वय २३) रा.शिरदे असे मृत्यू मुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.लहू भरत बगाड रा.शिरदे यांनी पोलिसांत खबर दिली.

मिळालेल्या माहितीनुसार,"लहू बगाड,जयदास बगाड,समीर बगाड,अजय बजाड,साईनाथ बगाड , अविनाश बगाड, रविंद्र बगाड असे सात जण ता.४ला रात्री बैल शोधायला उकसान पठार मेढीमाळावर गेले असता, विजेचा करंट लागून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

अविनाशच्या मागे आई,वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.तो वडेश्वरच्या शासकीय आश्रम शाळेत दहावीत शिकत होता. रविंद्रच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा: प्रथमच मिळालेल्या स्पोर्ट गणवेशाने हरखुन गेली आदिवासी बालके

या दोघांना विजेचा धक्का बसला ही माहिती मिळताच शिरदे ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात सह्याद्रीच्या पठारावरील मेंढीमाळ गाठला. दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांच्या आई वडीलांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेत होते. कामशेत पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

हेही वाचा: RSSची तुलना तालिबानशी; जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार सुनिल शेळके यांनी भेट देऊन चौकशी करून संबंधिताना आधार दिला.या बाबत पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत. सरपंच सुशीला बगाड म्हणाल्या," विजेचा धक्का बसून दोन जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.या कुटूंब व गावक-यांवर दु:खाचा कोसळला आहे. याची चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

loading image
go to top