कनेरसरच्या माजी उपसरपंचाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

खेड तालुक्‍याच्या ‘सेझ’ भागातील कनेरसरचे माजी उपसरपंच नवनाथ लक्ष्मण झोडगे (वय ३४) यांचा ठेकेदारीच्या वादातून पाच जणांनी कोयत्याने वार करून शुक्रवारी (ता. १३) दुपारी दोन वाजता खून केला.

शिरोली - खेड तालुक्‍याच्या ‘सेझ’ भागातील कनेरसरचे माजी उपसरपंच नवनाथ लक्ष्मण झोडगे (वय ३४) यांचा ठेकेदारीच्या वादातून पाच जणांनी कोयत्याने वार करून शुक्रवारी (ता. १३) दुपारी दोन वाजता खून केला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, झोडगे हे कनेरसर येथील ‘धूत बिल्डर्स’ या बांधकाम कंपनीचे उपठेकेदार म्हणून काम करीत होते. तेथे स्क्रॅप कॉन्ट्रॅक्‍ट मिळावे, यासाठी मयूर 
तांबे हा दोन-तीन दिवसांपूर्वी आला होता. आजही दुपारी तो कंपनीच्या साइट ऑफिसवर आला. त्याच्यासोबत आणखी चार जण होते. तेथे ठेकेदारीवरून झोडगे व तांबे यांच्यात बाचाबाची झाली. त्या वेळी तांबे याने स्वतःकडील लपवलेल्या कोयत्याने झोडगे यांच्यावर सपासप वार केले. तसेच, इतर कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखून धरले. झोडगे यांची हालचाल मंदावल्यानंतर ते तेथून फरारी झाले. त्यानंतर झोडगे यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार

याबाबतची फिर्याद कंपनीचे बांधकाम अभियंता विवेक मोहिते यांनी खेड पोलिस ठाण्यात दाखल केली. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पाच पथके रवाना केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांनी दिली.

दरम्यान, झोडगे हे कनेरसरचे माजी उपसरपंच होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, असा मोठा परिवार होता. झोडगे यांच्या नातेवाइकांनी खेड पोलिस ठाण्यात गर्दी करून मोठा आक्रोश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanersar deputy sarpanch murder crime