Pune : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी केशवनगर-मुंढवा

Pune : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल करावा

मुंढवा : एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणावत म्हणाल्या, सन १९४७ साली देशाला भीक मागून स्वातंत्र्य मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळाले होते, असे बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगना रणावतवर देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी केशवनगर-मुंढवा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मुंढवा पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: टीईटी, नेट परीक्षा आता एकाच दिवशी : तारखांचा गोंधळ संपणार कधी?

देशाच्या प्रती ज्या व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांचा अवमान कंगनानं तिच्या वक्तव्यातून केल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रसंगी कॉंग्रेसच्या हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश राऊत, बाळासाहेब टिळेकर, रवि गागडे, गणेश काकडे, रमेश पंडित, राकेश साठे, विनायक जगताप उपस्थित होते.

कंगनानं दोन दिवसांपूर्वी देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत टोकाचं विधान केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. कंगनाच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करुन तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. अशी मागणी कॉंग्रेस कमिटीने केली.

loading image
go to top