Kanifnath Fort IT Engineer planted 115 trees
Kanifnath Fort IT Engineer planted 115 trees

Pune : कानिफनाथ गडावर आयटी इंजिनिअरने 115 वृक्ष फुलवले

पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःपासून सुरुवात

उंड्री : कोरोना लॉकडाऊन जुलै 2020 मध्ये कानिफनाथ गडावर ट्रेकिंगला जात असताना आंब्याचे रोपटं लावल उन्हाळ्यातही जगवलं. आता बहरताना पाहून जून 2022 पासून आतापर्यंत एक नव्हे दोन नव्हे तब्बल 115 आणि तीही देशी वृक्षांची लागवड केली. खत आणि पाणी देण्यासाठी दर रविवार राखीव ठेवल्याचे ससाणेनगरमधील आयटी इंजिनिअर शंकर सावंत यांनी सांगितले.

सावंत म्हणाले की, कोरोनामध्ये लॉडाऊनच्या काळात जुलै 2020 मध्ये कानिफनाथ डोंगरमाथ्यावर एक आंब्याचे झाड लावले. उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था म्हणून 20 लिटरच्या पाण्याचा बाटलीला सलाईनचा पाईप लावून ठिबक सिंचन केले. दर आठवड्याला 20 लिटरचा जार पाण्याने भरायचो. दोन वर्षानंतर आज आंब्याचे झाड पाहताना खूप आनंद वाटला.

म्हणून जुलै, 2022 मध्ये डोंगराच्या मध्यांवर कमीतकमी पाच फूट उंचीची आणि एक वर्ष वयाची झाडे विकत घेतली. जुलै ते ऑगस्ट 2022 दरम्यान 115 वृक्षांची लागवड केली आहे. त्यामध्ये कदंब, रानभेंडी, ताम्हण, वड, पिंपळ, अर्जुन, मुछकुन, जांभूळ, उंबर, काशीद, अकाशिया, पर्जन्य वृक्ष, आकशनिंब, पांगरा, कांचन, चिंच, सोनचाफा, महोगनी, बकुळ गुलमोहर अशा विविध देशी वृक्षांचा समावेश आहे.

दर रविवारी दहा हजार लिटर पाण्याचा टँकर नेणे आणि झाडांना पाणी देणे. झाडांना लेंडीखत आणि पाणी वाहून जाणार नाही यासाठी झाडाभोवती आळ व्यवस्थित करणे, झाडांना आधार म्हणून काठी लावणे अशी कामे करतात.

यश नाईक, नितीन नाफाडे, स्वप्नील नेवसे, अमित खोचरे, अमित गायकवाड, अक्षय शिंदे यांच्या सहकार्याने वसुंधरा फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरणाच्या समतोलासाठी देशी वृक्ष लागवडीचा ध्यास

पर्यावरणाचा समतोल राखा असे सांगण्याबरोबर स्वतः एक पाऊल पुढे टाकून कानिफनाथ पायथ्यापासून डोंगरापर्यंत देशी वृक्ष लावडीचा ध्यास घेतला आहे. यामध्ये ट्रेकर्ससह मित्रांनी मोठा सहभाग घेतला आहे. आम्ही फक्त लागवड करून थांबलो नाही, तर वृक्षांना खत, पाणी, त्याची दर रविवारी पाहणी करीत तूटफूट झाली असेल तर दुरुस्तीही करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com