पुणे : मुसळधार पावसामुळे करण सिटो सोसायटीची संरक्षक भिंत पडली

रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वडगावशेरी येथील करण सिटो सोसायटीची सरक्षक भिंत कोसळली.
Karan Cito Society Security Wall Collapse
Karan Cito Society Security Wall CollapseSakal
Summary

रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वडगावशेरी येथील करण सिटो सोसायटीची सरक्षक भिंत कोसळली.

रामवाडी - रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वडगावशेरी येथील करण सिटो सोसायटी ची सरक्षक भिंत कोसळली. यामध्ये चार दुचाकी आणि एक सायकल प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने रहिवाशां कडून सांगण्यात आले आहे.

करण सिटो सोसायटी मध्ये जवळपास 400 रहिवासी राहतात. सोसायटीच्या मागच्या बाजूस सुरक्षिते साठी संरक्षक भिंत बांधली होती. पावसाच्या पाण्याचा वेग खूपच होता पाण्याच्या टाकी पर्यत पावसाचे पाणी आतमध्ये आले होते. दोन वर्षी रहिवाशांनी स्वखर्चातून बांधलेली भिंत रविवारी पडल्याने प्रचंड नुकसान सोसायटीचे झाले आहे. या सोसायटीच्या मागे असणारी रहिवासी प्रमिला नाथन यांच्या तीन दुचाकी नुकसान झाले. तर नंदू पाटोळे याची एक दुचाकी एक सायकल यांचे नुकसान झाले आहे. अजून एक दुचाकी एक सायकल अजून मातीच्या ढिगारा खाली आहे. सोसायटीचे रहिवासी दिनेश बल्लाळ म्हणाले प्रत्येक वर्षी सोसायटीमध्ये पावसाचे पाणी जमा होते. दोन दिवसानंतर पाण्याचा निचरा होतो. सदर ठिकाणी पावसाळी पाईपलाईनची कामे झाली नसल्याने आमच्या सोसायटीला अर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com