पुणे: कालव्यात मोटार कोसळून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सोनार पुल परीसरातील नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुळा-मुठा बेबी कालव्यावरील रस्त्यावर सकाळी जण अनेक व्यायाम करायला येतात. सोनार पुलाजवळुन जात असताना, काही जणांना साडेसहा वाजनेच्या सुमारास सोनार पुलाचा कठडा तुटलेला दिसला. यावर काही नागरीकांनी खाली वाकून पाण्यात पाहिले असता, त्यांना कालव्यातील पाण्यात एका चारचाकी गाडीचा टप तरंगताना दिसला.

लोणी काळभोर : भरधाव सॅन्ट्रो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, फुरसुंगी (ता. हवेली) हद्दीतील जन्या मुळा-मुठा बेबी कालव्यावरील सोनार पुलाचा कठडा तोडून कार कॅनॉलमध्ये पडल्याने झालेल्या अपघातात नितीन निवृत्ती कुंभार (वय, 44, रा. सासवड ता. पुरंधर) या कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. 12) पहाटे सहाच्या सुमारास घडला. नितीन कुंभार हे कदमवाकवस्ती येथील एजंल हायस्कुलमध्ये क्रिडा प्रशिक्षक होते. 

सोनार पुल परीसरातील नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुळा-मुठा बेबी कालव्यावरील रस्त्यावर सकाळी जण अनेक व्यायाम करायला येतात. सोनार पुलाजवळुन जात असताना, काही जणांना साडेसहा वाजनेच्या सुमारास सोनार पुलाचा कठडा तुटलेला दिसला. यावर काही नागरीकांनी खाली वाकून पाण्यात पाहिले असता, त्यांना कालव्यातील पाण्यात एका चारचाकी गाडीचा टप तरंगताना दिसला. यावर स्थानिक नागरीकांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली, तोपर्यंत विशाल हरपळे व त्यांच्या स्थानिक सहकाऱ्यांनी गाडीला दोर बांधुन गाडी बाहेर काढली होती. यावेळी नितीन कुंभार हे गाडीत एकटेच होते. 

नितीन कुंभार हे मागिल पंधरा वर्षापासुन एंजल हायस्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत क्रिडा प्रशिक्षक म्हणुण काम पहात होते. त्यांच्या हाताखालील अनेक खेळाडुनी क्रिकेट, कराटे, हॉकी व फुटबॉल सारख्या खेलात राज्य पातळीवर चमक दाखवलेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, संध्या व मुलगा ओंकार असा परीवार आहे. एंजल हायस्कुल परीवारातील एक उमदा क्रिडा प्रशिक्षक अपघातात गमावल्याने, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परीसरात दुखःचे वातावरण पसरले आहे.

Web Title: karate coach dead in accident near Pune