

Worker Shot Dead at Water Plant in Karegaon; Murder Case Registered
Sakal
शिरूर : कारेगाव (ता. शिरूर) येथील मध्यभागातील साईनगर परिसरात, पाण्याच्या छोटेखानी फिल्टर प्लॅण्टवर काम करणाऱ्या कामगाराचा दूचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी डोक्यात गोळी झाडून खून केला. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास भरवस्तीत घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाळी. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, परिसरातील सीसीटीव्ही च्या आधारे हल्लेखोरांचा माग काढला जात आहे. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.