कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव

मिलिंद संधान
बुधवार, 11 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) - पिंपरी चिंचवड शहर कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यादेवी यांच्या 293 व्या जयंती निमित्त दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा नुकताच पार पडला. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळुभाऊ फुले रंगमंदिराच्या मल्टीपरपज सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप नुकतेच करण्यात आले.  

यावेळी वाडीया कॉलेजचे संचालक डॉ आनंद दडस, ड प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, नगरसेविका उषा मुंढे, आशा शेंडगे - धायगुडे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, स्विकृत प्रभाग सदस्य महेश जगताप, माजी नगरसेवक राजु दुर्गे, श्रीगणेश सहकारी बँकचे अध्यक्ष सुर्यकांत गोफणे, राजेंद्र राजापुरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. 

डॉ दडस म्हणाले, " केवळ परिक्षेतील मिळालेल्या गुणांवरून विद्यार्थ्यांनी आपली विद्या शाखा न निवडता, त्यातील असणारी अभिरूची पाहुन आपले करीयर क्षेत्र निवडावे. विज्ञान, वाणिज्य व कला या तीनही क्षेत्रात व्यवसाय व नोकरीच्या संधी असल्या तरी कठिण परिश्रम आणि सातत्य यावर भविष्यातील यश अवलंबून आहे. "

प्रतिष्ठानचे सचिव अजित चौगुले यांनी सुत्रसंचलन केले. तर अध्यक्ष बिरू व्हनमाने यांनी प्रास्ताविक व संस्थापक कार्याध्यक्ष अजय दुधभाते यांनी आभार मानले.

Web Title: Karmayogini Ahilya Devi Holkar Pratishthan's behalf on behalf of the students