कर्नाटक हापूस मार्केटयार्डात दाखल; डझनाला आहे एवढा भाव

प्रविण डोके
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

  • पहिल्या टप्प्यात हापूसच्या ४३ बॉक्सची आवक झाली

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात सोमवारी कर्नाटक हापूसची आवक सुरू झाली आहे. या हापूसच्या एका डझनाला एक हजार रुपये इतका भाव मिळाला. पहिल्या टप्प्यात हापूसच्या ४३ बॉक्सची आवक झाली. त्यामुळे आता पुणेकरांना हापूसची चाहूल लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्नाटक हापूसचा हंगाम गेल्यावर्षी २० जानेवारी दरम्यान सुरू झाला होता. यंदा मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही आवक सुरु झाली आहे. सद्यस्थितीत या आंब्यांची आवक तुरळक प्रमाणात होत आहे. परंतु मार्चपासून नियमित आवक सुरु होईल. तसेच एप्रिलपासून मोठ्या प्रमाणात आवक होऊन जुनपर्यंत हंगाम सुरु राहील असे मार्केट यार्डातील व्यापारी भारत पंजाबी यांनी सांगितले.

कुमारस्वामींचा मुलगा अन् काँग्रेस नेत्याची भाची अडकणार लग्नाच्या बेडीत

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साधारणतः महिनाभर उशिरा हंगाम उशीरा झाला आहे. यंदा कर्नाटक हापूसचे उत्पादन चांगले आहे. तसेच सद्यस्थितीत बाजारात दाखल होत असलेला आंबा चांगल्या दर्जाचा असून ग्राहकांकडूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Hapus Entered in Market Yard Pune