Chandrakant Patil : धमक्या देऊ नका चर्चेसाठी बेळगावात जाणार

कर्नाटकातील मराठी भाषिकांशी चर्चा करण्यासाठी ६ डिसेंबरला बेळगावला जाणार आहे. आम्हाला कर्नाटक सरकारसोबत कोणताही संघर्ष करायचा नाही. तुम्ही कशासाठी संघर्ष वाढवत आहात.
 chandrakant Patil
chandrakant Patilsakal
Summary

कर्नाटकातील मराठी भाषिकांशी चर्चा करण्यासाठी ६ डिसेंबरला बेळगावला जाणार आहे. आम्हाला कर्नाटक सरकारसोबत कोणताही संघर्ष करायचा नाही. तुम्ही कशासाठी संघर्ष वाढवत आहात.

पुणे - कर्नाटकातील मराठी भाषिकांशी चर्चा करण्यासाठी ६ डिसेंबरला बेळगावला जाणार आहे. आम्हाला कर्नाटक सरकारसोबत कोणताही संघर्ष करायचा नाही. तुम्ही कशासाठी संघर्ष वाढवत आहात. आम्ही कर्नाटकमध्ये येणार धमक्या देऊ नका, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटक सरकारला बजावले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आदेशावरून तेथील मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्यसचिवांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटक दौऱ्यावर येऊ नये सांगितले आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना पुण्यात पत्रकारांशी विचारले. त्यावेळी पाटील म्हणाले, ‘कर्नाटकमधील ८६५ गावांमधील मराठी भाषकांना महाराष्ट्र सरकारतर्फे काय सुविधा देऊ शकतात यावर चर्चा करण्यासाठी मी ३ डिसेंबर रोजी बेळगावला जाणार होतो. पण आता ६ डिसेंबर रोजी बेळगावला जाणार आहे. कर्नाटक सरकारने त्यांचे नागरिक म्हणून या गावातील नागरिकांना सुविधा द्याव्यात. पण आम्ही देत असलेल्या सुविधांमुळे त्यांचे समाधानी होत असल्यास फायदा आहे. तुम्ही संघर्ष का वाढवत आहात? तुम्ही बंदी करू करून आम्ही थांबणार नाही, धमक्या देऊ नका. आम्ही चिथावणी देण्यासाठी नाही तर समन्वयाने चर्चा करण्यास जात आहोत.'

दरम्यान, कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांसाठी पाणी सोडले आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी अशी केली. त्यावर पाटील म्हणाले, ‘‘ राऊत यांना भूगोल कळतो का? जत तालुक्यातील १५ टेंभू व म्हैसाळ जलसिंचन योजनेतून पाणी दिले जाते, उर्वरित ४५ गावांसाठी दोन हजार कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. त्याचे काम जानेवारीत पूर्ण होईल. राऊत यांनी सकाळी उठून काही बोलायची सवय लागली आहे, अशी टीका केली.

हात जोडतो उदयनराजेंनी विषय संपवावा

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर पाटील म्हणाले, ‘राज्यपालांच्या वाक्याचे मी समर्थन करणार नाही. त्यांनी काळजी घ्यायला हवी होती. राज्यपालांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अनादर नाही, असे असते तर चालत शिवनेरी किल्ल्यावर चालत गेले नसते.

खासदार उदयनराजे भोसले यांना हात जोडून विनंती आहे की राज्यपालांकडून बोलण्यात एखादी चुकीची गोष्ट असेल तर त्यांनी मोठ्या मनाने हा विषय आता संपवावा.”

अजित पवार यांच्या भाकितावरून टोला

राज्यपालांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांनी ‘‘राज्यपालांना त्या पदावर रहायचे नाही, आम्हालाही ते नको आहेत. पण पाच डिसेंबरचे मतदान झाल्यानंतर कोश्‍यारी राजीनामा देतील. असे भाकीत व्यक्त केले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ‘पवार हे भविष्यकर्ते आहेत, राज्यातील सरकार जाणार हे त्यांना आधीच कळले होते. त्यामुळेच त्यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निम्म्या कामांना घाईघाईने मंजुरी दिली होती.’ असा टोला लागावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com