कार्तिकीनिमित्त आठवडाभर सोहळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीची सुरवात ३० नोव्हेंबरला होणार आहे. कार्तिकी एकादशी ३ डिसेंबर, तर संजीवन समाधी दिन सोहळा ५ डिसेंबरला होणार आहे. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे यांनी ही माहिती दिली.

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीची सुरवात ३० नोव्हेंबरला होणार आहे. कार्तिकी एकादशी ३ डिसेंबर, तर संजीवन समाधी दिन सोहळा ५ डिसेंबरला होणार आहे. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे यांनी ही माहिती दिली.

कार्तिक वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सकाळी सात ते नऊ या वेळेत वारीला सुरवात होईल. सोमवारी (ता. ३) एकादशीनिमित्त मध्यरात्री बारा ते पहाटे दोनच्या दरम्यान समाधी दर्शन बंद ठेवण्यात येईल. या दिवशी भाविकांच्या महापूजा बंद असतील. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी रात्री साडेआठला देऊळवाड्यातून परतणार असून, रात्री बारा ते दोन जागरचा कार्यक्रम होईल. द्वादशीला मंगळवारी (ता. ४) मध्यरात्री दोनला अभिषेक होईल. त्यानंतर पहाटे साडेतीन ते चार या वेळेत परंपरेप्रमाणे शासकीय पूजा प्रांताधिकारी यांच्या हस्ते होईल. बुधवारी (ता. ५) माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होईल. शुक्रवारी (ता. ७) रात्री साडेनऊला सोहळ्याची सांगता होणार आहे.

कार्तिकी वारीचा कार्यक्रम
 ३० नोव्हेंबर, शुक्रवार : हैबतबाबांचे पायरी पूजन (सकाळी ७ ते ९).
 ३ डिसेंबर, सोमवार : एकादशीनिमित्त अभिषेक (मध्यरात्री), नगरप्रदक्षिणेला सुरवात (दुपारी १), जागर कार्यक्रम (रात्री १२ ते २).
 ४ डिसेंबर, मंगळवार : अभिषेक (रात्री १२ ते २), शासकीय पूजा (पहाटे ३.३० ते ४), पालखी नगरप्रदक्षिणेस सुरवात (दुपारी ४ ते ७), रथोत्सवाची सांगता (सायंकाळी ७), प्रसादवाटप (रात्री ११ ते १२). 
 ५ डिसेंबर, बुधवार : संजीवन समाधी दिन सोहळा, संत नामदेवांच्या वंशजांकडून पूजा (सकाळी ७ ते ९), मानाचे कीर्तन (७.३० ते ९.३०), नामदास महाराजांचे कीर्तन (सकाळी १० ते १२), घंटानाद, पुष्पवृष्टी (दुपारी १२).
 ७ डिसेंबर, शुक्रवार : पालखी प्रदक्षिणा, सांगता (रात्री ९.३०).

Web Title: Kartiki Wari Program