कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक

विनायक बेदरकर
बुधवार, 24 जानेवारी 2018

‎यापूर्वी ही योजना दोन वेळा राबविण्यात आली होती.मात्र स्थानिक नागरीकांच्या विरोधामुळे प्रशासनाला ही योजना बंद करावी लागली आहे. 2006 साली आठ दिवस आणि 2017 साली 1 दिवस महापालिका प्रशासनाने कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकामध्ये चक्राकार वाहतूक योजनेचा प्रयोग राबवीला होता. मात्र या प्रयोगामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याएवजी प्रचंड वाढल्याने नागरिकाना मनस्ताप सहन करावा लागला

कोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुढील 10 महिन्यांसाठी पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक योजना राबविण्यात येणार असल्याचा मेट्रो, वाहतूक पोलिस, महापालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप (अभिनव) चौकात वाहतूकीची मोठी कोंडी होत आहे. यावर उपाययोजना म्हणून एसएनडीटी चौक ते अभिनव चौक या अंतरामध्ये चक्राकार वाहतूक योजना राबविण्यात येणार आहे. पुढील पंधरा दिवसानंतर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. कर्वे रस्त्यावर फ्लायओव्हर ते नळस्टॉप या दरम्यान मेट्रो पिलरचे काम सुरु होत आहे.त्यामुळे या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. हा वाहतूक बदल कसा असेल याचा निर्णय आज (बुधवारी) सकाळी पाहणी करुन घेण्यात आला.

यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे,महामेट्रो चे रितेश गर्ग,एन सी सी चे नामदेव गव्हाणे, महापालिका उपायुक्त श्रीनिवास बोनाला, स्थायी समीती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,नगरसेवीका माधुरी सहस्त्रबुद्धे,मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका हर्शाली माथवड, वासंती जाधव, संदीप खर्डेकर, संदीप मोकाटे आदी उपस्थित होते.

‎यापूर्वी ही योजना दोन वेळा राबविण्यात आली होती.मात्र स्थानिक नागरीकांच्या विरोधामुळे प्रशासनाला ही योजना बंद करावी लागली आहे. 2006 साली आठ दिवस आणि 2017 साली 1 दिवस महापालिका प्रशासनाने कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकामध्ये चक्राकार वाहतूक योजनेचा प्रयोग राबवीला होता. मात्र या प्रयोगामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याएवजी प्रचंड वाढल्याने नागरिकाना मनस्ताप सहन करावा लागला. आणि नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर ही योजना गुंडाळावी लागली होती.

‎यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर वाहतूकीची मोठी कोंडी होते. येत्या पंधरा दिवसांत पदपथाची रुंदी कमी करणे, वीजेचे खांब हटविने, बॅरीगेटिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना वाहतूक कोंडीतुणतुन दिलासा देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे.

‎यावेळी मेट्रो अधिकाऱयांनी वाहतूक पोलिसांशी सल्ला मसलत करुन वाहतूकीत केल्या जाणाऱ्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार कोथरूड कडुन येणारी वाहतूक एसएनडीटी शेजारील कॅनाल रस्त्यावर वळविली जाणार असून सदर वाहतूक आठवले चौकातून नळस्टॉप चौकाकडे जाईल.नळस्टॉप ते पौडफाटा उड्डाण पुलापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येणार असुन या रस्त्याचा 9 मीटर चा भाग हा मेट्रो पिलर उभारणी साठी वापरला जाणार आहे.

मात्र हा वाहतूक बदल अमलात आणण्यापूर्वी कर्वे रस्त्यावरील आवश्यक बदल तातडीने पूर्ण करावेत अशी सूचना वाहतूक पोलिस सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले व प्रतिभा जोशी यांनी केली. तर यापूर्वी ठरल्याप्रमाणे संपूर्ण कर्वे रस्ता नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करण्याबाबतचे फलक अद्याप लावले नाहीत; तसेच पदपथ छोटा करणे, हलविलेल्या बसस्टॉपबाबतचे माहिती फलक उभारले नसल्याबद्दल संदीप खर्डेकर व माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली.

मेट्रो चे काम वेगाने पूर्ण करत असताना नागरिकांची सुरक्षितता याला आम्ही प्राधान्य देणार असून वाहतूक कोंडी कमीतकमी व्हावी यासाठी दक्षता घेतली आहे असे मुरलीधर मोहोळ व संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

प्रयोग करा पण हट्ट नको
‎वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून चक्राकार वाहतूक योजनेचा प्रयोग करण्यास हरकत नाही. मात्र नागरिकाना त्रास होता कामा नये. योजना असफल झाल्यास कोणाच्या हट्टासाठी सुरू ठेवू नये. तसेच कर्वे रस्त्यावरील पदपथाची रुंदी कमी केल्यास वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. याबाबतीत मी मेट्रो आणि महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करणाऱ आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे स्थानिक नगरसेवक जयंत भावे यांनी सकाळशी बोलताना दिली.

Web Title: karve road traffic pune news