Pune Karvenagar Car Fire
esakal
पुण्यातील कर्वेनगर परिसरात बुधवारी एका चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. कर्वेनगर पुलाखाली ही घटना घडली असून, गाडीला आग लागल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.