

Leave and License Server Issue
esakal
कर्वेनगर : शासनाची ऑनलाइन ‘लीव्ह अँड लायसन्स’ नोंदणी सेवा २१ डिसेंबर २०२५ पासून बंद असून, कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा बंद केल्याने नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सोमवारपासून ‘आधार ऑथेंटिकेशन’ होत नसल्याने ही सेवा पूर्णपणे बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘लीव्ह अँड लायसन्स’ भाडेकरार हा रहिवासी पुरावा म्हणून महत्त्वाचा दस्तऐवज आहे. नवीन बँक खाते उघडणे, गृहकर्ज व इतर कर्जप्रकरणे, वाहन खरेदी, गॅस कनेक्शन, इंटरनेट सुविधा, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रवेशासाठी हा करार अनिवार्य असतो. मात्र, सर्व्हर बंद असल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत.