स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानुसार नगरपरिषदांच्या निवडणुका अद्याप जाहीरही झालेल्या नाही मात्र बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पक्षाने राज्यातील पहिली उमेदवारी जाहीर केली असून बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मनीषा मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसच बुलढाण्यातील सर्व नगरपरिषदा ,जिल्हा परिषद जागा आम आदमी पक्ष लढणार असल्याची माहिती ही आपचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरेश पाटील यांनी दिली आहे. बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने या शहरात उच्चशिक्षित नागरिक मतदार असल्याने आम आदमी पक्षाला मोठे यश मिळेल अशी अपेक्षा आम आदमी पक्षाला आहे. आम आदमी पक्षाने बुलढाणा नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिल्याने आतापासूनच अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.