Kasba By-election:"मोदी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" पटोले म्हणतात टिळक आज असते तर...

अदानीची संसदीय समिती, सेबी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार
Nana Patole
Nana Patole sakal

पुणे : "मोदी सरकार हे लोकशाहीला मनात नाही, म्हणूनच लोकशाहीची थट्टा करणाऱ्या मोदी सरकारला लोकशाहीच्या मार्गाने आसमान दाखवून देण्याचे काम कसबा व चिंचवड विधनाभा पोट निवडणुकितुन करायचे आहे.देशातील "एलआयसी", "एसबीआय"मधील सर्वसामान्य लोकांचा पैसा लुटणाऱ्या गौतम अदानीविरुद्ध संसदीय समितीची स्थापना करावी, सेबीच्या माध्यमांतून सखोल चौकशी करावी.

" अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवित

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अदानी समूहाच्या "एलआयसी","एसबीआय" व इतर संस्थांमधील गैर कारभाराविरुद्ध टिळक चौकातील "एलआयसी"च्या कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, आमदार विश्वजित कदम, संग्राम थोपटे, संजय जगताप, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी,अमर राजूरकर आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, " देशाच्या सर्वसामान्यांचे पैसे गोळा करून मोदी यांनी त्यांच्या मित्र असणाऱ्यांना पैसे दिले. मोदी यांच्या भाषणात त्यांनी स्टॅलिनचां उल्लेख केला होता. याच स्टॅलिनने राज्य आपल्याकडे राखत मुस्लिम लोकांना संपविले, मोदी यांनी ही मुस्लिमांना विरोध करीत विरोधक हे संपविण्याचा कारस्थान रचत आहे. अडानीने खोट्या कपंन्या दाखवून एलआयसी", एसबीआय"मधील पैसे लुटले.

मुळात एलआयसी", एसबीआय" या संस्था लोकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी होत्या. 8 वर्षात मागे असणारा अडानी हा जागतिक पातळीवर थेट दुसऱ्या क्रमांचा श्रीकांत व्यक्ती बनला.हिंडनबर्ग अहवालातून अडानी चा खोटेपणा पुढे आला . मोदी सरकारला हे अडानी सारख्या मित्राला वाचविण्याची धडपड करीत आहेत.

जनतेच्या, विरोधकांच्या प्रश्नाचे उत्तर मोदी सरकार देत नाही. संसदेत मोदी सरकार हुकूमशाही करीत आहे. जनतेच्या एका एका पैशाचा हिशोब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनात पोलिसांचा जादा बंदोबस्त आहे, आम्ही एलआयसी" लुटायला आलो नाही, ज्यांनी लुटले त्यांना तुम्ही पकडणार का ? "

पटोले म्हणाले, "मोदी आज आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. सगळ्या सरकारी संस्था मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. लोकशाही मानणारे हे सरकार असेल तर त्यांनी न्याय व्यवस्थेत अडचण आणु नये. देशातील नागरिकाला गरीब करून गुलाम बनविण्याचे काम सुरू आहे आम्ही इंग्रजांना आम्ही घाबरलो नाही, मग फडणवीस, अमित शहा यांच्या पोलिसांच्या दबावांना आम्ही घाबरणार नाही. अडानी च्या ताब्यात चौथा स्तंभ ही देण्याचा प्रयत्न होत आहे.

टिळक आज असते तर त्यांनी मोदी सरकारवर "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का " असा जाब विचारला असता. राहुल गांधी यांचा आवाज हा गरीबांचा आहे. न्यायव्यवस्था. माध्यमे यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.लोकशाही मांने हा काँग्रेसचा धर्म आहे, हा धर्म न मानाने हा भाजपचा धर्म आहे. कोणतीच व्यवस्था लोकशाही मार्गाने चाललेली नाही.

वाचलेली लोकशाही दाखविण्याचा प्रयत्न कसबा विधांशभा पोट निवडणुकीतून दाखवून द्यायचे आहे. हा मतदार संघ भाजप स्वतःच्या मालकीचा समजतो आहे, ते काँग्रेसच्या बाजूने निकाल देऊन दाखवून द्यावे. लोकशाहीची थट्टा करणाऱ्यांना लोकशाहीच्या मार्गाने दाखवून देण्याचे काम करून दाखवणे. अडानी विरोधात जॉइंट पार्लमेंट कमिटी नेमली, सेबीच्या माध्यमातून चौकशी करावी. ही मागणी संसदेमध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे करीत आहेत."

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, "देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे जनसामान्यांचा आक्रोश व्यक्त केला पाहिजे. अनेक जण भविष्य सुरक्षित राहण्यासाठी "एलआयसी" मध्ये पॉलिसी काढतात. "एसबीआय" देशातील अग्रणी बँक आहे,

त्यात सामन्याचे पैसे या बँकेत आहेत. मात्र हाच सामान्य जनतेचा पैसा एलआयसी, एसबीआय"मधील पैसा अदानीच्या कंपनीला देऊन लोकांची फसवणूक केली. सामन्याला वृद्धापकाळात मिळणारा पैसा अदाणीच्या कंपनी द्वारे गेला आहे.

हिंदेनबर्ग रिपोर्टवर आगोदर लक्ष्य दिले असते तर लोकांचे पैसे वाचले असते. नियंत्रक संस्था काय करणार ? सरकारने संसदेत लोकांचे बुडालेले पैसे लोकांना परत मिळाले पाहिजेत. हा प्रश्न राजकीय नव्हे, तर सर्वसामान्य लोकांच्या हिताचे आहे. हा जणाक्रोष आहे. लोकांचे भविष्य अंधारात ठेवून त्यांची फसवणूक केली जात आहे. लोकातील हा आक्रोश व्यक्त झाल्याशिवाय राहणार आहे."

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मे 2014 ला मोदी सरकार सत्तेवर आले. मोदींचे गुजरातच्या उद्योग पतींशी जवळचे संबंध असणे साहजिक आहे. गौतम अडाणी, नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्याशी त्यांचे संबंध आहेत.

परदेशात याच लोकांना शिष्ट मंडलात घेऊन जात होते. त्यामुळे काही ठराविक उद्योगपती, व्यापारी यांच्या जवळ पंतप्रधान यांच्यासमवेत आहेत हे दिसले. त्यामुळे आपल्या वित्त संस्थांनी नियम मोडून त्यांना पैसे दिले. लुटारूंना बँकांनी मोठ्या प्रमाणत कर्ज दिले.

काही जण पळून गेले, तर काहींनी मे 2014 पासून ते आत्तापर्यंत सगळ्या सरकारी वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वित्तीय लाभ घेतला, त्यामध्ये अडानीचा समावेश आहे. कमी तारण असताना त्यांना कर्जे दिली. 2014 मध्ये अडणीचा नंबर 614 वां क्रमांक होता, त्यांचा आता देशातील एक तर जगातील 2 क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून पुढे आले. "फोर्ब्ज"च्या यादीतून अडानी हे जगातील 615 क्रमांकावरून 2 ऱ्या क्रमांकावर आले. अडानीचे शेअर्स अमेरिकेच्या शेअर बाजारात आले,

तेव्हा तेथील हिंडनबर्गने अडानी हे खोटे असल्याचे पुढे स्पष्ट झाले. हिंडनबर्गच्या प्रश्नाला त्यांनी उत्तरे दिली नाहीत. अडानीमुळे एलआयसी", एसबीआय"ला चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या संस्थांच्या शेअर्स घसरले आहेत.

सरकारी कंपन्यानी दबाव आला तेव्हा एलआयसी", एसबीआय"च्या अधिकाऱ्यांनी विरोध का केला नाही. या प्रश्नाची जगात चर्चा सुरू आहे, मात्र भारताच्या संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. सरकारला आज जाब विचारला नाही, तर उद्या आपल्या संस्था बुडतील, आपले भविष्य धोक्यात येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. दोषी असणाऱ्यावर कारवाई करा."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com