Kasba Bypoll Election : कसब्यात खळबळ! प्रचारादरम्यान सापडली लाखोंची रोकड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money

Kasba Bypoll Election : कसब्यात खळबळ! प्रचारादरम्यान सापडली लाखोंची रोकड

Kasba Bypoll Election : कसबा आणि चिंचवडमध्ये येत्या २६ फेब्रुवारी रोजी पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

या दोन्ही ठिकाणी विजयासाठी भाजप आणि मविआकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्यात काल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सात तास बैठका घेतल्याने भाजपनं विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व घडामोडींमध्ये कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांना सहा लाखांची रोकड सापडली आहे. आढळून आलेल्या रकमेनंतर निवडणूक अधिकारी स्वारगेच पोलीस स्टेशनमध्ये याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

ज्या गाडीत ही रक्कम आढळून आली आहे त्या गाडी चालकाकडे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र, चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने निवडणुकीसाठीच ही रोकड आणली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जर ही रक्कम वाटण्यासाठी आणली असल्यास यातील काही रक्कम वाटण्यात आली आहे का? याचा तपास पोलीस करत असून, ऐन मतदानापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.