Kasba Bypoll Election : भाजपाचा 'हुकमी एक्का' उतरणार मैदानात; विरोधकांचं टेन्शन वाढलं!

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून याची राज्यभर चर्चा आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sakal
Updated on

Kasba Bypoll : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून याची राज्यभर चर्चा आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी या दोन्ही ठिकाणांवर मतदान पार पडणार असून, काल संध्याकाळपासून कसब्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.

Devendra Fadanvis
Mumbai Police : बायकोला 'इम्प्रेस' करण्यासाठी इंजिनिअर बनला 'हॅकर'; पोलिसांनी 'असा' लावला छडा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सात तास बैठका पार पडल्या आहेत. त्यामुळे कसब्यासह चिंडवडची जागा जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

या सर्वांमध्ये कसब्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काल फडणवीसांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता स्वतः गिरीश बापट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

Devendra Fadanvis
Raquel Welch Death : गोल्डन ग्लोब विजेती अभिनेत्री रॅक्वेल वेल्च काळाच्या पडद्याआड

आजारी असूनही खासदार गिरीश बापट आज कसबा पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरणाची शक्यता वर्तवली जात असून, संध्याकाळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बापट मार्गदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Devendra Fadanvis
Pune Bypoll Election : फडणवीस रचतायत खास प्लॅन? पुण्यात रात्री तब्बल 7 तास खलबतं

केसरी वाड्यात होणाऱ्या कार्यक्रमात बापट स्वतः हजर राहून किंवा ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

येत्या २६ तारखेला होणऱ्या मतदानापूर्वी बापटांचे मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जात असून, मतदानाच्या काहीदिवस आधी भाजपनं निवडणुक जिंकण्यासाठी कसब्यातील हुकमी एक्का बाहेर काढल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com