Girish Bapat : कसब्याचे 'किंगमेकर' बापट आजारपणातही मैदानात; म्हणाले, हेमंतला थोडं... | Girish Bapat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Bapat

Girish Bapat : कसब्याचे 'किंगमेकर' बापट आजारपणातही मैदानात; म्हणाले, हेमंतला थोडं...

पुणे - पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्याचं कारण म्हणजे दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते. शिवाय कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र यावेळी कसब्यामध्ये चुरस आहे. सध्याची परिस्थिती पाहता, भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही मैदानात उतरले आहे.

गिरीश बापट यांनी अनेक वर्षे या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे त्यांचा शब्द कसब्यात महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय भाजपने ब्राह्मणेत्तर उमेदावर दिल्याने मतदार वेगळा निर्णय घेतील, याची शक्यता होता. त्यामुळे आज हेमंत रासनेचा प्रचार करण्यासाठी खुद्द बापट समोर आले आहे.

बापट म्हणाले, १९६८ नंतर प्रथमच मी या निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकू अनेक वेळा हरलो, पण पक्ष संघटन कायम राहिले. ही निवडणूक चुरशची नाही, ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेले अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धान्य मानलं, असं बापट यांनी म्हटलं.

आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे. हेमंतचे काम चांगले आहे, थोडं नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल, असं आवाहनही बापट यांनी केलं.

टॅग्स :BjpGirish Bapat