पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी 4 वाजून 32 मिनिटांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. 

पुणे : पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी 4 वाजून 32 मिनिटांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. 

महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ स्वीकारून विसर्जनासाठी रवाना झाला होता. सकाळी 10.15 वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीला सुरवात झाली. लक्ष्मी रस्त्यावरुन अलका चौकात ही मिरवणूक निघाली होती. कलावंत आणि रुद्रगर्जना आणि प्रभात बँडच्या निनादात परिसर दणाणून सोडला. त्यानंतर दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी गणपती टिळक चौकातून आला. 

त्यानंतर सायंकाळी 4 वाजून 32 मिनिटांनी कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasba Ganapati immersion in Pune