कात्रज, धनकवडीला अखंडित वीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नव्या स्विचिंग स्टेशनची उभारणी; यंत्रणेसाठी तीस कोटींचा खर्च

कात्रज - महावितरणच्या ‘इंफ्रा दोन’ योजनेतून आंबेगाव बुद्रुक येथे साई मॅजेस्टिक हे नव्याने स्विचिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. तसेच पूर्वीच्या पाच स्विचिंग स्टेशनला वीजपुरवठ्याची अतिरिक्त पर्यायी व्यवस्था उभारल्यामुळे कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, सुखसागरनगर, कात्रज कोंढवा रस्ता परिसर, भारती विद्यापीठ, आंबेगावसह कात्रज घाटातील वाड्यांना वीज अखंडित उपलब्ध होणार आहे. या यंत्रणेसाठी तीस कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

महावितरणच्या धनकवडी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कात्रज, बालाजीनगर, आंबेगाव व धनकवडी शाखा भागात लोकसंख्या झपाट्याने वाढली. पाठोपाठ वीज मागणीही दहापटीने वाढली. या भागाला होणारा वीजपुरवठा आणि वीज मागणी यांचे व्यस्त प्रमाण यंत्रणेतील बिघाडाला कारणीभूत ठरू लागले होते.  

दरम्यान, नोव्हेंबर २०१३ ला धनकवडी उपविभागीय कार्यालयात अतिरिक्त अभियंता म्हणून देविदास वाबळे यांची नियुक्ती झाली. त्यांनी ‘इंफ्रा दोन’ योजनेतून ही नवी यंत्रणा उभारली आहे. 

आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालय परिसरातील साई मॅजेस्टिक सोसायटी शेजारी नवे स्विचिंग स्टेशन उभारण्यात आले. नांदेड अति उच्च दाब उपकेंद्रातून तब्बल सात किलोमीटर अंतरावरील अमित ॲस्टोनिया सोसायटी येथील स्विचिंगला चार फीडर म्हणजेच २८ किलोमीटरच्या सक्षम केबल टाकण्यात आल्या. तेथून कात्रजच्या राजीव गांधी स्विचिंगला दोन, तर नव्याने उभारलेल्या साई स्विचिंगला दोन फीडर जोडण्यात आले. त्यालाच पर्वतीकडून दोन फीडर टाकण्यात आले. तेथून पंचवटी स्विचिंगला आणि लेकटाउन तसेच कात्रजच्या राजीव गांधी स्विचिंगला अतिरिक्त पर्यायी फीडर जोडण्यात आले. त्याचवेळी येवलेवाडी अति उच्चदाब उपकेंद्राकडून शांतिसागर सोसायटी स्विचिंगसह लेकटाउन स्विचिंगला पर्यायी फीडर जोडण्यात आले. या यंत्रणेत नव्याने तेवीस रोहित्र उभारण्यात आले, तर जुन्या बारा रोहित्रांची क्षमता वाढवण्यात आली. तब्बल पन्नास किलोमीटरच्या उच्चदाब भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या. प्रत्येक स्विचिंग स्टेशनला अतिरिक्त पर्यायी वीजपुरवठा करणाऱ्या प्रकल्पासाठी तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले. 

मी तीन वर्षांपूर्वी धनकवडीला रुजू झालो आणि त्या क्षणापासून या भागाला अखंडित वीज देण्याचा निर्धार केला. येथील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी झाला. आज निवृत्त होताना या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान पेलता आले हा आनंद सदैव स्मरणात राहील.
- देविदास वाबळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता 

Web Title: katraj dhankawadi electricity