Kondhwa News : रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांची धोकादायक कसरत

कात्रज-कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिर चौकात रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी धोकादायक कसरत करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
katraj kondhwa road
katraj kondhwa roadsakal

कोंढवा - कात्रज-कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिर चौकात रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी धोकादायक कसरत करत असल्याचे निदर्शनास येत आहे. इस्कॉन मंदिर चौकात महापालिकेककडून भुयारी मार्गाचे काम सुरु असून जवळपास १५ ते २० फुट खोल रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र, याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याकडे प्रशासनाचे सर्सास दुर्लक्ष होत आहे.

भुयारी मार्गासाठी खोदकाम केलेले असताना साधारणतः एक फूट रुंद जागा पाण्याच्या लाईनमुळे राहिलेली आहे. मात्र, पादचाऱ्यांकडून या जागेचा उपयोग रस्ता ओलांडण्यासाठी करण्यात येत आहे. या ठिकाणांवरून ये-जा करताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

अपघात झाल्यास जिवितहानीही होऊ शकते. या ठिकाणांहून शाळकरी मुले, मजूर, महिला सातत्याने ये-जा करत असतात. हे ठिकाण धोकादायक झाले असून एखादा अपघात घडल्यास प्रशासन उपययोजना करणार आहे काय? असा प्रश्न यानिमीत्त उपस्थित होत आहे.

सुरक्षारक्षकांचा अभाव

तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषित केल्यानंतर १२५ सुरक्षारक्षक या रस्त्याचे काम सुरु असताना वाहतूक नियंत्रण करण्यासाठी लावले असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र एखादा सुरक्षारक्षक सोडला तर दुसरा रस्त्यावर कोणीही वाहतूक नियमन करताना दिसत नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक केवळ कागदावरच नेमलेले आहेत काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया

पाण्याच्या लाईनमुळे ते काम तातडीने करता आले नाही. आता पाण्याची लाईन बदलण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी खोदकाम पूर्ण होईपर्यंत वाहतूक पोलिसांना सांगून अधिक वॉर्डन नेमण्याची मागणी करण्यात येईल. जेणेकरुन या धोकादायक ठिकाणांवरून पादचारी ये-जा करणार नाहीत.

- धनंजय गायकवाड, उपअभियंता पथविभाग, महापालिका

हे ठिकाण अत्यंत धोकादायक झाले आहे. तरीही काही नागरिक, शाळकरी मुले जीव मुठीत धरुन याठिकाणांवरून प्रवास करतात. प्रशासनाने उपाययोना करण्यासोबतच अशा लोकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा अपघात झाल्यास कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते.

- सुरज माने, स्थानिक नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com