Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील परिस्थिती: चुकीच्या पद्धतीने वाहतूक

कात्रज-कोंढवा रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सिमेंटचे दुभाजक लावण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांना ठराविक ठिकाणांवरूनच वळण घेण्यास मुभा होती.
Katraj-Kondhwa road misdirected traffic accident traffic police pune
Katraj-Kondhwa road misdirected traffic accident traffic police puneSakal

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सिमेंटचे दुभाजक लावण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांना ठराविक ठिकाणांवरूनच वळण घेण्यास मुभा होती.

परंतु, काही वाहनचालकांकडून दुभाजकांना हलविण्यात आले असून अवैध पद्धतीने वाहने वळविण्यासाठी जागा करण्यात आल्या आहेत. हे धोकादायक असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेकडे पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर अनेक ठिकाणी अशा प्रकारे दुभाजकाशी छेडछाड करण्यात आली आहे. राजस सोसायटी चौक ते गोकुळनगर चौकापर्यंत हे प्रमाण जास्त आहे. दुभाजकांना केलेली छेडछाड दुरुस्त करण्यात यावी, तसेच अशा पद्धतीने हे सिमेंटचे दुभाजक हलविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे.

आतापर्यंत कात्रज-कोंढवा रस्त्यांवर अनेक वाहनचालकांचे अपघाती बळी गेले आहेत. मात्र, महापालिकेने दुभाजक टाकण्याच्या केलेल्या उपाययोजनेनंतर या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणांवर कमी झाले आहे.

मात्र, मोठा वळसा घालून इच्छितस्थळी पोहोचावे लागत असल्याच्या भावनेतून मोठ्या प्रमाणांवर हे दुभाजक हटवून धोकादायक वळणे नागरिकांकडूनच देण्यात आली आहेत. यामध्ये दुचाकीचालकांसाठी केलेल्या छेडछेडाचे प्रमाणा जास्त आहे.

वाहतूक पोलिसांशी समन्वय साधत याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. तसेच, तत्काळ या दुभाजकांची दुरुस्ती करुन अशा प्रकारची धोकादायक वाहतूक थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

- धनंजय गायकवाड, उपअभियंता, पथविभाग, महापालिका

नागरिकांनी अशा प्रकारे करणे चुकीचे असून याबाबत पाहणी करुन कडक कारवाई करण्यात येईल. तसेच, महापालिकेसोबत समन्वय साधत अशा प्रकारे दुभाजक हटिवण्यात आले असतील त्याची दुरुस्ती करण्यात येईल

- विजय टिकोळे, पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ पोलिस

नागरिकांची मानसिकता अत्यंत चुकीची आहे. त्यांना शॉर्टकट मारण्याची सवय लागली आहे. परंतु, अशाने मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळते. हे धोकादायक असून असे करणाऱ्या लोकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच, नागरिकांनीही स्वतःहून नियम पाळणे आवश्यक आहे.

- नरेंद्र शिंदेकर, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com