कात्रज-कोंढवा रस्त्यांवरून पायीच करा प्रवास

कात्रज चौक ते खडीमशीन चौक असे कात्रज-कोंढवा रस्त्याचे एकूण साडेतीन किलोमीटर अंतर आहे. मात्र, हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाऊण तास लागत आहे.
Katraj Kohndhwa Road Traffic
Katraj Kohndhwa Road TrafficSakal
Summary

कात्रज चौक ते खडीमशीन चौक असे कात्रज-कोंढवा रस्त्याचे एकूण साडेतीन किलोमीटर अंतर आहे. मात्र, हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाऊण तास लागत आहे.

कात्रज - कात्रज चौक (Katraj Chowk) ते खडीमशीन चौक (Khadimachine Chowk) असे कात्रज-कोंढवा रस्त्याचे (Road) एकूण साडेतीन किलोमीटर अंतर आहे. मात्र, हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाऊण तास लागत आहे. रस्त्यांवरील वाहतूककोंडीने (Traffic Issue) वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. कात्रजचौक ते गोकुळनगर चौक हे अंतर तर केवळ १.९ किलोमीटरचे आहे. मात्र, सायंकाळी वाहतूककोंडीच्या वेळी मोटारीने हे अंतर पार करण्यासाठी गुगलच्या सांगण्यानुसार तब्बल २७ तर दूचाकीने १८ मिनीटांच वेळ लागतो. प्रत्यक्षात चारचाकी गाडीने हे अंतर पार करण्यांसाठी पाऊण तासाचा कालावधी लागतो. याचवेळी हे अंतर पायी प्रवास करुन पार केल्यास ते २३ मिनीटात पूर्ण करता येते. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यांवरून पायीच प्रवास बरा म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने धुळीचे तर अक्षरशः लोट तयार होत आहेत. रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांचे चेहरे धुळीने माखत असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या रस्त्यावरून सांयकाळी तासाला १२ ते १४ हजार वाहनांची ये-जा होते. त्यामुळे आधीच रस्ता अरुंद आणि त्यात मोठ्या प्रमाणांवर वाहनांची वर्दळ असल्याने लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येते. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये मंजूर करुन निविदा काढण्यात आल्याचे पथविभागाकडून सांगण्यात आले असले तरी रस्त्यांवरील साधे खड्डेही व्यवस्थित बुजविण्याची तसदी महापालिकेने मागील काही दिवसांपासून घेतलेली दिसत नाही.

मुळातच अरुंद असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा हातगाडी, पत्राशेड, कंपाउंड अशी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. महापालिका बांधकाम विभागाने काही प्रमाणांत अतिक्रमणे काढली. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. महापालिकेत प्रशासकराज आल्यानंतर प्रशासन अॅक्टिव्ह मोडमध्ये येऊन विविध ठिकाणी मोठ्या कारवाया झाल्या. मात्र कात्रज-कोंढवा रस्त्याकडे आणखी लक्ष गेले नाही. त्यामुळे प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने जागा हस्तांतरण करून कामाला गती देत वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्याची मागणी स्थानिक नागरिक धनंजय आतकरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

निविदा काढण्यात आलेली असून कामही सुरु होणार होते. मात्र, त्याठिकाणी पाण्याची लाईन टाकण्यात येणार असल्याने कामास उशीर झाला आहे. पुढील आठवड्यात ज्या जागेचा ताबा मिळाला आहे, त्याठिकाणी रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, आम्ही अतिक्रमण विभागाच्या संपर्कात असून रस्त्याच्या कामासाठी ते ताब्यात आलेली जागा उपलब्ध करुन देतील.

- व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग

नागरिकांना जागेचा मोबदला मिळाला नसल्याने कारवाई करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पुढील आठवड्यात वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई करुन वाहतुकीला अडथळा ठरणारी छोटी-मोठी दुकाने आणि अनधिकृत पत्राशेड हटविण्यात येतील.

- प्रताप धायगुडे, उपअभियंता बांधकाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com