Katraj
KatrajSakal

Katraj News : कात्रज सर्पोद्यान तलावातील दुर्गंधीने नागरिक त्रस्त

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावात गाळ न काढल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

कात्रज - राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावात गाळ न काढल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिसरात डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढवा असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी तलावात मिसळत असल्याने आणि गाळ न काढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

तलावाच्या आजूबाजूला असलेल्या लेकटाऊन, पद्मजा सोसायटी, गंगा ओसियन आदी सोसायट्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर, सर्पोद्यानात मोठ्या प्रमाणांवर पर्यटकही येतात. त्यांनाही दुर्गंधी आणि डास-मच्छरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

याबाबतीत महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन कोणताही मार्ग काढण्यात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, ड्रेनेज विभागही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याबाबत, महापालिकेच्या ड्रेनेज विभागासोबत सातत्याने आमचा पत्रव्यवहार सुरु असल्याचे प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात येते.

आमच्या सोसायटीला लागून असलेल्या कात्रज तलावात आजूबाजूच्या परिसरातील मैलापाणी कायम येते. त्यामुळे ही दुर्गंधी येते. निवडणुका आल्या की मतासाठीच फक्त पुढारी, राजकारणी यांना १२६५ सदनिका असलेली आमची सोसायटी दिसते. गेल्या ५ वर्षापासून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही आजपर्यंत काहीही उपयोजना झालेल्या नसल्याचेले कटाऊन सोसायटीचे सदस्य अॅड. प्रतिक गवारी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे काम याठिकाणी सुरु आहे. ते पुढील तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल. तसेच, तलावातील गाळ काढण्यासाठीही निधी मिळालेला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पाण्याची दुर्गंधी येणार नाही आणि नागरिकांना त्रास होणार नाही.

- श्रीधर येवलेवकर, प्रभारी अधिक्षक अभियंता, ड्रेनेज विभाग

रोज संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ही दुर्गंधी तीव्र रुप धारण करते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संध्याकाळी येणार्‍या दुर्गंध वासाने चालणारी जेष्ठ मंडळी, खेळणारे लहान मुले थांबूही शकत नाही अशी परिस्थिती आहे. प्रशासनाने त्वरित समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे.

- महेश धूत, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com