Katraj Traffic : कात्रज चौकाला वाहतूक कोंडीचा फास; वाहनचालक त्रस्त

कात्रज चौकातील कोंडी कोंढवा रस्त्यांवरील राजस चौकापर्यंत, सातारा रस्त्यांवर भारती विद्यापीठपासून गुजरवाडी फाट्यापर्यंत तर मुंबई महामार्गावर नवले पुलापर्यंत असल्याचे दिसून येते.
Ktaraj Chowk Traffic
Ktaraj Chowk TrafficSakal
Summary

कात्रज चौकातील कोंडी कोंढवा रस्त्यांवरील राजस चौकापर्यंत, सातारा रस्त्यांवर भारती विद्यापीठपासून गुजरवाडी फाट्यापर्यंत तर मुंबई महामार्गावर नवले पुलापर्यंत असल्याचे दिसून येते.

कात्रज - कात्रज चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, यामध्ये बेजबाबदार वानचालकांमुळे भर पडत आहे. त्याचबरोबर चौकात चालू असलेले उड्डाणपुलाचे काम आणि मोठ्या प्रमाणांवर होणारी अवजड वाहतूक ही वाहतूक कोंडीची मुख्य कारणे आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसून तेच हतबल असल्याचे दिसत आहे.

कात्रज चौकातील कोंडी कोंढवा रस्त्यांवरील राजस चौकापर्यंत, सातारा रस्त्यांवर भारती विद्यापीठपासून गुजरवाडी फाट्यापर्यंत तर मुंबई महामार्गावर नवले पुलापर्यंत असल्याचे दिसून येते. यावेळी अनेकदा राजस चौकात पोलिस असतात मात्र, ते कोंढवा रस्त्यांवरून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर थांबून राहतात. मात्र, कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर चौकात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पीएमपीएलच्या बसेसही वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहेत. चौकात होणाऱ्या कोंडीमुळे पीएमपीएमएल आगाराकडून येणाऱ्या बसेसना गुजरवाडी बस स्थानकावरून वळवून कात्रज बसथांब्यावर आणण्याचा आदेश आहे. मात्र, पीएमपीएमएल चालकांकडून अनेकवेळा याला केराची टोपली दाखवण्यात येत आहे.

कात्रज चौकात रिक्षा, बसदेखील थांबत असतात त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात या चौकात गर्दी करतात. त्याचबरोबर, उजवीकडे बसेस व अवजड वाहनांना वळण्यास बंदी असताना त्याचेही पालन होताना दिसत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणांवर वाहतूक कोंडी होते आणि दोनशे मीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी मोजावा लागतो. कोंढवा रस्ता, सातारा रस्ता, नवले पूल आणि पुणे शहरातून एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी अधिकची भर पडते.

दत्तनगर ते कात्रज चौक मार्गावर वाहतूक कोंडीची हीच परिस्थिती असते. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असताना वाहतूक पोलिसांकडून सर्सास दुर्लक्ष होताना दिसत आहे. या मार्गावर सर्सास अवजड वाहतूक सुरु असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असते. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

प्रतिक्रिया -

कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरु असतात. मात्र मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पीएमपीएलच्या बसगाड्या आणि अवजड वाहतूक यांच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर चौकात उड्डाणपुलाचे सुरु असलेले काम वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे.

- प्रशांत कणसे, सहाय्यक पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ

पीएमपील चालकांना कुठलाही नियम नाही. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणांवर असलेली बेशिस्त अवजड वाहतूकीने अक्षरशः कात्रज चौकातून प्रवास करणे धोकादायक आणि जिकीरीचे झाले आहे. सकाळच्या वेळी चौकातून प्रवास करायचा म्हणजे एक तास अधिकचा काढूनच घरातून बाहेर पडावे लागते.

- योगेश शेलार, वाहनचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com