Katraj Zoological Museum : कात्रज प्राणी संग्रहालयाची वर्षभरात सात कोटींची कमाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय २० मार्च २०२२ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते.
katraj zoo
katraj zoosakal

कात्रज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय २० मार्च २०२२ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानंतरच्या वर्षभरात म्हणजे २०२२-२३ या अर्थिक वर्षात प्राणी संग्रहालयाला उच्चांकी सुमारे आठ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते.

मात्र त्यानंतर पर्यटकांचा हा ओघ काही प्रमाणात कमी झाला असून २०२३-२४ या अर्थिक वर्षात एक कोटी रुपयांच्या उत्पन्नात घट झाली आहे. या वर्षात सुमारे सात कोटी रुपयांची प्राणी संग्रहालयाची कमाई झाली आहे.

कोरोनापूर्वी होत असलेल्या गर्दीपेक्षा सद्यस्थितीत प्राणी संग्रहालयात होत असलेली गर्दी मोठ्या प्रमाणात असून उत्पन्नही अधिक आहे. प्राणी संग्रहालायाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या तिकीट विक्रीतून वर्षभरात ६ कोटी १२ लाख ११ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर १७ लाख ८६ हजार ९९२ पर्यटकांनी भेट दिली आहे.

इलेक्ट्रिक बॅटरीवरील गाडीसाठी आकारण्यात आलेल्या दरातून २९ लाख ५० हजार १४५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तर, या वर्षीपासून प्राणीसंग्रहालय प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाईन तिकीटविक्रीचा ८९ हजार ७०४ पर्यंटकांनी लाभ घेतला. या माध्यमांतून प्रशासनाला ३० लाख ४३हजार ३७४ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.

पर्यटकांनी यंदाही मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. एकूण पर्यटकांमध्ये १ हजार ५८३ विदेशी पर्यटकांनीही भेट दिली. गेल्या वर्षभरात सुटीच्या दिवशी एका दिवसात २० ते २२ हजारांपर्यंत पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून प्राणी संग्रहालयाला दरदिवशी चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

तक्ता

वर्ष--(२०२२-२३)--(२०२३-२४)

पर्यटकांची संख्या--१७लाख६१हजार८४९--१४लाख४१हजार५०१

लहान मुले--३लाख४०हजार७७५--२लाख८७हजार४५८

विदेशी पर्यटक--१हजार५६३--१हजार५८३

बॅटरी ऑपरेटेड कार उत्पन्न--२२लाख७६हजार६१०--२९लाख५०हजार१४५

ऑनलाईन बुकिंग-- उपलब्ध नव्हते--३०लाख४३हजार३७४

एकूण उत्पन्न--७कोटी६९लाख१२हजार४७७-६कोटी७२लाख५हजार२९९

*उत्पन्नाचे आकडे रुपयांमध्ये

प्रतिक्रिया

कोरोना काळात प्राणी संग्रहालय बंद होते. त्यानंतरच्या वर्षभरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. तो ओघ ओसरला असला तरी कोरोनाच्या आधी होणाऱ्या गर्दीपेक्षा ही संख्या जास्त आहे. कारण, प्राणी संग्रहालयाने अनेक प्राणी पर्यटकांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी खुले केले आहेत. ऑनलाईन तिकीटविक्रीही सुरु केली आहे. प्राणी संग्रहालयात असलेल्या प्राण्यांव्यतिरिक्त आणखी प्राणी वाढविण्याकडे आमचा कल आहे. अशा सुविधांमुळे पर्यटकांचा कल वाढत आहे.

- अशोक घोरपडे, मुख्य उद्यान निरिक्षक, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com