esakal | पाणी प्रश्‍नावरून मुख्यसभेत कावड आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

कावड आंदोलन

पुणे : पाणी प्रश्‍नावरून मुख्यसभेत कावड आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : फुरसुंगी- उरळी देवाची भागात भीषण पाणी टंचाई असून, महापालिकेकडून टँकरने अपुरा पाणी पुरवठा केला जातो. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खांद्यावर कावड घेऊन मुख्यसभेत आंदोलन केले. ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी अर्धवट असलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण केली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

हेही वाचा: दौंड - भीमा पाटस प्रकरणी अण्णा हजारे यांना साकडे

महापालिकेच्या मुख्यसभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ढोरे हे खांद्यावर कावड घेऊन येऊन पाणी प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. नगरसेविका वैशाली बनकर, नगरसेवक योगेश ससाणे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा देत महापौरांच्या आसनासमोर आंदोलन सुरू केले. २०१७ मध्ये ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली. या गावात महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणी पुरवठा योजना राबवली जात होती.

हेही वाचा: धीरज घाटे यांच्या खुनाच्या कटातील तिघांना शुक्रवारपर्यंत कोठडी

हे गाव महापालिकेत आल्यानंतर शासनाने हे काम बंद केले आहे. उर्वरित काम महापालिकेने पूर्ण करावे अशी मागणी आहे, पण गेल्या चार वर्षात काम झाले नाही. मात्र, दरवर्षी या भागात सुमारे ९ कोटी रुपये टँकरसाठी खर्च केले जात आहेत. यातून ठेकेदाराला पोसण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप ढोरे यांनी केला.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत आयुक्तांकडे बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

loading image
go to top