

Road Blockade on Ashtavinayak Highway
Sakal
कवठे येमाई : शिरूर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. काल पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रोहन बोंबे या शाळकरी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या वीस दिवसांत पिंपरखेड व जांबुत या दोन गावांतील तीन जणांचा जीव गेल्याने परिसरात प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण पसरले आहे.