esakal | कोरोना मदतनिधीसाठी केदार जाधवचे दहा लाख
sakal

बोलून बातमी शोधा

kedar jadhav

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव याने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना मदतनिधीसाठी दहा लाख रुपयांची मदत दिली आहे.

कोरोना मदतनिधीसाठी केदार जाधवचे दहा लाख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव याने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना मदतनिधीसाठी दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री मदतनिधी आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) यांच्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये अशी मदत त्याने दिली आहे.

नरेंद्र मोदींनी म्हणून 5 एप्रिल हा दिवस निवडला?

केदारने सांगितले की, सध्या इतक्या कठिण परिस्थितीत संकटाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील बंधू-भगिनींनी आपले सर्वस्व पणास लावले आहे. डॉक्टर रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या गरजा आपण लवकरात लवकर पूर्ण करू शकू अशी आशा आहे. त्यासाठी मी माझ्यावतीने ही मदत करीत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

26 मार्च रोजी केदारने रक्तदान करून आपला वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा केला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, कोरोनामुळे रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर लागू शकते, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. त्यास प्रतिसाद म्हणून मी रक्तदानाचा संकल्प सोडला.