Kedarnath Flood Survivor Shivam Found Alive in Pune
esakal
Kedarnath Tragedy Survivor : एखाद्या सिनेमातील दृश्यासारखा प्रसंग पुण्यामध्ये घडला आहे. एखादी मृत व्यक्ती अनेक वर्षानंतर जिवंत आहे असं कळल्यानंतर तुम्हालाही एकदम फिल्मी घटना वाटेल. परंतु पुण्यात हे खरं घडलय. 2015 मध्ये केदारनाथ इथं पुरामध्ये अनेकांचा जीव गेला. यात काहीजण वाहून सुद्धा गेले. त्यामध्ये शिवम सुद्धा होता. पुराच्या घटनेनंतर त्याला त्याच्या कुटुंबियांनी शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु तो काही सापडला नाही. शेवटी त्याच्या कुटुंबियांनी त्याला मृत समजून त्यांच्यावर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले. दरम्यान आता तब्बल दहा वर्षानंतर शिवम पुण्यात सापडलाय.