विकासकामांत भान ठेवावे - आमदार शेळके

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

‘नगरसेवक हे नगर परिषदेचे मालक नसून विश्‍वस्त आहेत, याचे भान ठेवून विकासकामे करताना भ्रष्टाचाराला थारा देऊ नये. नागरिकांचा पैसा योग्यरीतीने खर्च करून पारदर्शी काम करण्याची जबाबदारी स्वीकारावी,’’ असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.

तळेगाव दाभाडे - ‘नगरसेवक हे नगर परिषदेचे मालक नसून विश्‍वस्त आहेत, याचे भान ठेवून विकासकामे करताना भ्रष्टाचाराला थारा देऊ नये. नागरिकांचा पैसा योग्यरीतीने खर्च करून पारदर्शी काम करण्याची जबाबदारी स्वीकारावी,’’ असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमदारपदी निवड झाल्याबद्दल तळेगाव नगर परिषदेतर्फे आयोजित नागरी सत्कारात ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर घरचा सत्कार स्वीकारताना दोन सहकारी बरोबर घेऊन आलो, याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने स्वार्थापायी बिनविरोध निवडीची परंपरा खंडित केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

शरद पवारांच्या हत्येचा कट? पोलिसांत तक्रार, 'सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान'

सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासाचे राजकारण करण्याच्या हेतूने जनसेवा विकास समितीने यापूर्वी भाजपबरोबर सत्तेत सहभाग घेतला. मात्र, याला प्रतिसाद मिळत नसल्यानेच भाजपची साथ सोडल्याचे गणेश खांडगे यांनी या वेळी स्पष्ट केले. या निवडणुकीत तळेगाव शहर सुधारणा समितीला केवळ शहरविकासाच्या मुद्यावर साथ दिल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकात मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी शेळके यांनी नगरसेवक पदापासून सुरुवात करून विधानसभेत गेल्याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. या वेळी ज्येष्ठ नेत्या सुलोचनाताई आवारे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांच्या हस्ते मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन शेळके यांचा सत्कार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keep in mind the development work sunil shelake