esakal | पुण्यासाठी दीडशे टन ऑक्सिजनसाठा ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen

पुण्यासाठी दीडशे टन ऑक्सिजनसाठा ठेवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी मागणीच्या तिप्पट साठा म्हणजेच सुमारे १५० टन आक्सिजनचा साठा ठेवा, अशा सूचना राज्य शासनाने महापालिकेला दिल्या आहेत. महापालिकेने शहरात विविध ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास सुरवात केली आहे. त्याचा आढावा आज अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी घेतला. त्या वेळी आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Pune : सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची टंचाई भासली होती. त्यामुळे महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागली. या काळात शहरातील ऑक्सिजनची दैनंदिन मागणी सुमारे ५० मेट्रिक टनापर्यंत गेली होती. भविष्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनच्या सर्वाधिक मागणीच्या तीनपट ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण करा, अशा सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर ६ जणांकडून दोन अडीच महिने लैंगिक अत्याचार

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील लिक्विड ऑक्सिजन टँक, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, जंबो व ड्युरा सिलिंडरची संख्या पुरेशी असणार आहेत. सीएसआर फंडातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांच्या चाचण्याही सुरू आहेत. महापालिकेकडे सध्या ६८ ड्युरा सिलिंडर आहेत. पण आणखी ३५ ड्युरा सिलिंडरची खरेदी केली जाणार आहेत, असे बिनवडे यांनी सांगितले.

‘ऑक्सिजन’वर असणार नियंत्रण

महापालिकेकडे किती ऑक्सिजनसाठा आहे, याची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व ऑक्सिजन प्रकल्पांवर मॉनिटरिंग सिस्टिम बसवली जाणार आहे. एखाद्या रुग्णालयात ऑक्सिजन साठा कमी होत असल्यास महापालिकेला त्याची सूचना मिळेल. त्यामुळे योग्यवेळी ऑक्सिजन पुरवठा करता येईल, असे बिनवडे यांनी सांगितले.

loading image
go to top