esakal | तक्रारवाडी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शंभर टक्क्यांनी सुरू । School
sakal

बोलून बातमी शोधा

तक्रारवाडी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शंभर टक्क्यांनी सुरू

तक्रारवाडी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शंभर टक्क्यांनी सुरू

sakal_logo
By
डॉ. प्रशांत चवरे

भिगवण : तक्रारवाडी (ता.इंदापुर) केंद्रातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शंभर टक्के शाळा पहिल्याच दिवशी सुरु झाल्या आहेत. विविध शाळांमध्ये सुमारे ७० टक्के विदयार्थी उपस्थित राहिले असल्याची माहिती तक्रारवाडी केंद्राचे प्रमुख हनुमंत देवकाते यांनी दिली आहे. विदयार्थ्यांना गुलाब पुष्प, वह्या पुस्तके व गणवेश देऊन विदयार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तक्रारवाडी(ता.इंदापुर) या केंद्रामध्ये १० प्राथमिक ०६ माध्यमिक व ०४ उच्च माध्यमिक शाळा आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांनी दिलेले सोयाबीन मुख्यमंत्र्यांना देणार भेट : फडणवीस

शासनाच्या आदेशानुसार तक्रारवाडी केंद्रातील शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्रप्रमुख हनुमंत देवकाते यांनी सर्व शाळांशी संपर्क साधुन शासनाच्या शाळा सुरु करण्याबाबतचे धोरण मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांना अवगत केले होते. केंद्र पातळीवरुन करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले असुन पहिल्याच दिवशी तक्रारवाडी केंद्रातील शंभर टक्के प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेमध्ये आलेल्या विदयार्थ्यांचे काही ठिकाणी गुलाब पुष्प देऊन तर काही ठिकाणी थेट वह्या पुस्तके व शालेय साहित्य देऊन स्वागत केले.

हेही वाचा: ग्राऊंड रिपोर्ट: अतिवृष्टीच्या पुरात ‘हिरवं स्वप्न’ही गेलं वाहून

शाळांच्या वतीने विदयार्थ्यांचे तापमान घेणे, सॅनिटायझर, मास्क, सामाजिक अंतर आदी बाबींचे काटेकोरपणे पालन करण्यात येत होते. काही बंधनासह का होईना परंतु शाळा सुरु झाल्याबद्दल विदयार्थ्यांमध्ये आनंदाची भावना होती. मागील वर्षभर ऑनलाईन ऑफलाईनच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या शाळा अखेर सुरु झाल्यामुळे पालक वर्गांनी समाधान व्यक्त केले. याबाबत तक्रारवाडी केंद्र प्रमुख हनुमंत देवकाते म्हणाले, तक्रारवाडी केंद्रातील शंभर टक्के शाळा पहिल्या दिवशी कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सुरु झाल्या आहेत. शाळांकडून शंभर टक्के काळजी घेतली जात असुन पहिल्याच दिवशी सत्तर टक्केंच्या आसपास उपस्थिती होती. पालकांनी घाबरुन न जाता योग्य त्या सुरक्षिततेसह पाल्यांना शाळेत पाठवावे.

loading image
go to top