केईएम रुग्णालयाच्या बाल रुग्णसेवेच्या चार दशकांच्या वाटचालीवर टाकलेला प्रकाश

डॉ. आनंद पंडित
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

देशाच्या बाल आरोग्य धोरणाला आकार देणाऱ्या पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाला येत्या रविवारी (ता. ९) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने बाल रुग्णसेवेच्या चार दशकांच्या वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश...

देशाच्या बाल आरोग्य धोरणाला आकार देणाऱ्या पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाला येत्या रविवारी (ता. ९) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने बाल रुग्णसेवेच्या चार दशकांच्या वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लहान मुलांच्या आजाराचं नेमकं निदान आणि त्यावर प्रभावी उपचार म्हटलं, की पुण्यातील ‘केईएम’चा बालरोग विभाग असं हे चार दशकांचं नातं. या विभागाने खडखडीत बरी केलेली मुलं त्यांचा चाळिसावा वाढदिवस आता साजरा करीत आहेत. दिव्यांग लहान मुलांसाठी फारच कमी सोयी असलेला तो काळ होता. या मुलांना चांगल्या उपचारांच्या पायाभूत सुविधा मिळणं हे मोठं आव्हान होतं. पण, ‘केईएम’मधील बानू कोयाजी यांच्या प्रेरणेने हे आव्हान पेलण्याची जिद्द निर्माण झाली. सामान्य मुलांच्या उपचारांसाठी रुग्णालयाकडे निधी नसायचा, तर अशा दिव्यांग मुलांसाठी निधी असण्याचा प्रश्‍न येत नव्हता. पण, सर्व दिव्यांग मुलांवर एकाच ठिकाणी उपचार करता येतील का, याचा विचार केला, सखोल अभ्यास केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात देशातील आणि परदेशांतील मित्रांनी सढळ हाताने मदत केली. हा काळ होता १९७६-७७ चा. 

लहान दिव्यांग मुलांवर उपचाराचं, त्यांचं पुनर्वसन करण्याचं एक प्रारूप पुण्यात विकसित झालं. कालांतराने हेच प्रारूप ‘आरबीएसके’ (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम) म्हणून साकार झालं. देशभरात अशा ‘डीईआयसी’ (डिस्ट्रिक अर्ली इंटर्व्हेंशनल सेंटर) उभारण्यात येऊ लागल्या. हे प्रारूप निर्माण झालं तेच मूळ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत. याचा फायदा खूप दिव्यांग मुलांना झालेला आपल्याला आता दिसतो.

मुलांच्या शरीराबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि भावनिकतेचा गांभीर्याने विचार यात केला आहे. आधुनिक काळातही हे पूर्वीइतकंच देशातील वेगवेगळ्या रुग्णालयंत वापरलं जातं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. 
- डॉ. आनंद पंडित, बालरोगतज्ज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KEM Hospital Story